शेतकऱ्यांचे पैसे सरकारने वसूल करून द्यावेत त्या बदल्यात शेतकरी 10 टक्के कमिशन सरकारला देतील

साखर कारखानदारांकडील बुडीत किंवा थकीत असलेले शेतकऱ्यांचे पैसे सरकारने वसूल करून द्यावेत त्याबदल्यात शेतकरी 10 टक्के कमिशन सरकारला देतील

  मोहोळ,दि.9/11/2021: साखर आयुक्तांनी शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलातून महावितरण ला साखर कारखानदारांकडून विज बिल वसुल करणे बाबत पत्र दिले आहे.त्याबदल्यात महावितरण साखर कारखानदारांना 10 टक्के कमिशन देणार आहे .थेट शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलातून पैसे  देण्याचा कुठलेही अधिकार कारखानदारांना नाहीत तरीदेखील सरकार अशा पद्धतीने जुलमी वसुली करण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना एफआरपी ची रक्कम वेळेत मिळत नाही तसेच त्या संदर्भातला रास्त भाव सुद्धा मिळत नाही आणि एक रकमी पैसे देण्याची मागणी कित्येक दिवस प्रलंबित आहे या गोष्टींकडे सहकार मंत्री आणि साखर आयुक्त लक्ष देत नाहीत? जे शेतकरी ऊस पिकवत नाहीत,फळबागा किंवा इतर पिके घेतात त्या शेतकऱ्यांची वीज वसुली सरकार कशी करणार ? ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मानगुटावरच ही वसुलीची कारवाई का ? सरकार त्यांच्या थकबाकी वेगवेगळे योजना आणून वसूल करत आहे.

   अनेक शेतकऱ्यांची ऊसाची रक्कम कारखानदारांनी बुडवलेली आहे किंवा थकित ठेवलेले आहे अशा शेतकऱ्यांचे पैसे वसूल कसे होणार ? शेतकऱ्यांची थकीत किंवा बुडीत रक्कम सरकारने वसूल करून द्यावी त्या बदल्यात शेतकरी सुद्धा 10% कमिशन सरकारला देतील. या संदर्भात शेतकरी स्वतंत्र हमी अर्ज प्रशासनाला देतील. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना रक्कम वसूल करून देण्याबाबतचे शासन स्तरावर तरतूद करण्यात यावी.

साखर कारखानदारांकडून वीज वसुलीबाबतचा साखर आयुक्तांनी काढलेला आदेश म्हणजे सरकारने आणि साखर कारखानदार या दोघांनी मिळून केलेली शेतकऱ्यांची एक पिळवणूक आहे. हा दिलेला आदेश 15 नोव्हेंबर पर्यंत रद्द न केल्यास संघटनेच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल अशा अशयाचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल गुंड यांनी दिला आहे . 

यावेळी अभिजीत नेटके,अनिल पाटील,गणेश मोरे, प्रमोद आठवले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: