न्यूझीलंड संघाने केला अनोखा विक्रम; सलग तिसऱ्यांदा ICCच्या…


दुबई: टी-२० वर्ल्डकपच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडचा ५ विकेटनी पराभव केला आणि प्रथमच टी- २० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून इंग्लंडला फलंदाजील करण्याचे आमंत्रण दिले. त्यांनी २० षटकात ४ बाद १६६ धावा केल्या. मोईन अलीने नाबाद ५१ धावांची खेळी केली. न्यूझीलंडने विजयाचे लक्ष्य १९व्या षटकात पाच विकेटच्या बदल्यात शानदार पद्धतीने पार केले. सलामीवीर डेरील मिचेल याने नाबाद ७२ धावा केल्या.

वाचा- पुढच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचे काही खर नाही, BCCIने केली पराभवाची तयारी

अखेरच्या दोन षटकात न्यूझीलंडला विजयासाठी २० धावांची गरज होती. ख्रिस वोक्सच्या या ओव्हरमध्ये मिचेलने २० धावा करून विजय मिळून दिला. त्याने २ षटकार आणि एक चौकार मारून इंग्लंडचा धक्का दिला. न्यूझीलंडकडून जिमी निशमने महत्त्वाची खेळी केली त्याने ११ चेंडूत ३ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने २७ धावा केल्या. याचा न्यूझीलंडला फायदा झाला. इंग्लंडचा पराभव करून न्यूझीलंडने एक अनोखा विक्रम केलाय. आयसीसीच्या स्पर्धेत सलग तीन वेळा फायनलमध्ये पोहोचण्याची कामगिरी न्यूझीलंडने केली आहे. क्रिकेट विश्वात आतापर्यंत अशी कामगिरी अन्य कोणत्या संघाला जमली नाही. न्यूझीलंड संघ २०१९च्या वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला होता. त्यानंतर या वर्षी टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आणि आता टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये त्यांनी स्थान मिळवले आहे.

वाचा- स्वत:च्या देशाचा शत्रू झाला हा क्रिकेटपटू; म्हणाला, पाकिस्तान…

२०१९ मध्ये फायनल सामन्यात इंग्लंडने त्यांचा सुपर ओव्हरमध्ये अधिक चौकाराच्या जोरावर विजय मिळवाल होता. तर टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी भारताचा पराभव करून विजेतेपद मिळवले. टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा प्रथमच पराभव झाला आहे. याआधी त्यांनी २०१० साली श्रीलंकाचा तर २०१६ साली न्यूझीलंडचा पराभव करून फायनलमध्ये स्थान मिळवले होते. इंग्लंडचा गेल्या पाच सेमीफायनलमधील हा पहिला पराभव ठरला. याआधी १९८३ साली भारताने त्यांचा पराभव केला होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: