कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारीपदी फारुक बागवान

कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारीपदी फारुक बागवान Farooq Bagwan as District Information Officer of Kolhapur

कोल्हापूर -कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांची सिंधुदुर्गच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर फारुक बागवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे . गुरुवारी या बदलीचे आदेश मिळाल्यानंतर प्रशांत सातपुते तातडीने सिंधुदुर्गला रवाना झाले.तेथे त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारून कामाला प्रारंभ केला. प्रशांत सातपुते गेल्या दोन वर्षांपासून कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होते.कोल्हापूर जिल्ह्याचा त्यांच्या कडे अतिरिक्त पदभार होता. त्याचबरोबर त्यांच्याकडे महाराष्ट्र परिचय केंद्र पणजी – गोवा वरिष्ठ सहाय्यक संचालकपदाचीही जबाबदारी आहे . या रिक्त झालेल्या जागेची जबाबदारी आता फारुक बागवान यांच्यावर सोपविण्यात आली आहे .

फारुक बागवान यांच्याकडे कोल्हापूरची जबाबदारी

कोल्हापुरातच माहिती उपसंचालक कार्यालयात सहायक संचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या फारूक बागवान यांच्याकडे कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे . गेल्या सप्टेंबरमध्ये बागवान मुंबईहून कोल्हापुरातील उपसंचालक कार्यालयात रूजू झाले होते . आता त्यांना कोरोनाच्या संकटाबरोबरच लवकरच पावसाळा सुरु होणार असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते त्यावेळी जिल्हा माहिती कार्यालयावर मोठी जबाबदारी असते.ही महत्वाच्या पदाची जबाबदारी निश्चितच पार पाडतील .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: