नेटकऱ्यांचा कौल मान्य!अब्जाधीश एलन मस्क यांनी १.१ अब्ज डाॅलर्सचे टेस्लाचे शेअर्स विकले


हायलाइट्स:

  • मस्क यांनी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लामधील १.१ अब्ज डॉलरमध्ये शेअर्स विकले आहेत.
  • टेस्लाचे शेअर्स विकावे का? याबाबत मस्क यांनी चाहत्यांना व सोशल मीडिया वापरकर्त्यांना विचारणा केली होती.
  • त्यानंतर नेटकऱ्यांनी शेअर्स विकावेत, या बाजूने मतदान केले.

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला. मस्क यांनी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लामधील १.१ अब्ज डॉलरमध्ये शेअर्स विकले आहेत. टेस्लाचे शेअर्स विकावे का? याबाबत मस्क यांनी जगभरातील त्यांच्या चाहत्यांना आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांना विचारणा केली होती. त्यानंतर नेटकऱ्यांनी शेअर्स विकावेत, या बाजूने मतदान केले.

Paytm ने रचला इतिहास; देशातील सर्वात मोठ्या ‘IPO’ला गुंतवणूकदारांचा तुफान प्रतिसाद
रेग्युलेटरी फायलिंगनुसार, मस्क यांनी २१.५ लाख शेअर्सच्या स्टॉक ऑप्शनचा वापर केला. त्यानंतर त्यांनी ९,३४,००० शेअर्स १.१ अब्ज डॉलरमध्ये विकले. मस्क यांनी करापासून वाचण्यासाठी शेअर्स विकले, असे म्हटले जात आहे. मस्क यांना २०१२ मध्ये स्टॉक ऑप्शन पुरस्कार मिळाला होता. मस्क यांनी २०१६ नंतर पहिल्यांदाच स्टॉक ऑप्शनचा वापर केला आहे.

चांगली बातमी! आता तुम्ही स्वत: करु शकता आधारचे ऑफलाइन व्हेरिफिकेशन, जाणून घ्या
टेस्लाच्या शेअर्समध्ये तेजी
टेस्लाचे शेअर्स सोमवार आणि मंगळवारी घसरले. यामुळे मस्क यांची एकूण संपत्ती दोन दिवसांत ५० अब्ज डॉलरने घटली, पण बुधवारी कंपनीचा शेअर ४.३ टक्क्यांनी वाढला. यामुळे मस्क यांची एकूण संपत्ती पुन्हा ११.२ अब्ज डॉलरने वाढली. यासह त्यांची एकूण संपत्ती २९९ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मस्क यांनी टेस्लाचे शेअर्स विकण्यासाठी ट्विटरवर पोल सुरू केला होता. ३.५ दशलक्ष नेटकऱ्यांनी त्यात भाग घेतला आणि ५८ टक्के लोकांनी शेअर्स विकावेत या बाजूने मतदान केले.

गुंतवणूकदारांची दिवाळी; ‘नायका’च्या शेअरची दमदार एंट्री, पदार्पणात एक लाख कोटींना
जगातील सर्वात मूल्यवान कार कंपनी
शुक्रवारी (५ नोव्हेंबर) कंपनीचे समभाग मागील महिन्याच्या तुलनेत ४० टक्क्यांहून अधिक वाढले. गेल्या आठवड्यात टेस्लाच्या शेअरने १,२२९.९१ डॉलर प्रति शेअर हा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. १ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त मार्केट कॅप असलेली ही जगातील सर्वात मूल्यवान कार निर्माता कंपनी आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: