कुर्डुवाडीत सततच्या कारवाईमुळे नाराजी , सर्वाना लस देण्याची मागणी

कुर्डुवाडीत सततच्या कारवाईमुळे नाराजी , सर्वाना लस देण्याची मागणी Dissatisfied with continuous action in Kurduwadi,demand for vaccination of all

कुर्डूवाडी / राहुल धोका – कुर्डूवाडी शहरात काही दुकानदार यांच्यावर नुकतीच कारवाई झाली.नेहमीच नागरिक व व्यापारी ,भाजीपाला विक्री करणारे शेतकरी यांच्यावर दंड कारवाई होते. या विषयात सर्वसामान्य नागरिकांत आता नाराजी पसरू लागली आहे.

घरात बंद किती दिवस राहायचे ,लस दिली तर बरे होईल,या बंदमध्ये शेतकरी, सामान्य नागरिक भरडला जात आहे अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासन मात्र कारवाईनंतर स्वतःची पाठ थोपटण्यात धन्यता मानत आहे.

याबाबत काही मान्यवरांच्या प्रतिकिया -

गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचा गोंधळ चालू आहे आता काळी,पांढरी बुरशी आली आहे.लोक संपर्क ,सवांद समाप्त झाला आहे .जेष्ठ नागरिकांना घरा बाहेर पडता येत नाही. स्वदेशी दोन लसी असून हि लस मिळत नाही पण शासन तपासणी, दंड , फिर्याद करण्यात आनंद मानत आहे .सर्व वयोगटा तील लोकांना योग्य किमतीत लस उपलब्ध करून द्यावी – किरण गोडसे , अध्यक्ष विठ्ठलमाई जेष्ठ नागरिक संघ

 व्यापारी वर्ग सतत लोक संपर्कात येतो २०२० -२०२१ मध्ये सतत लॉकडाऊन चालू आहे. लहान व्यापारी वर्गाचे हाल होत आहेत. नियम पाळणे गरजेचे आहे पण दुकाने बंद किती दिवस ठेवणार? आता तर तिसरी लाट येणार असे शासन सांगत आहे .सर्व व्यापारी वर्गाचे लसीकरण करा ही आमची विनंती आहे - अनुप दोशी, सचिव किराणा व्यापार असोशिएशन

कोरोनाची तिसरी लाट येणार असे सांगत आहेत मोठ्या नागरिकांची आणि लहान मुलांची प्रतिकार शक्ती यात फरक आहे .आपण लहान मुलांना आपण फार जपतो कारण लहान मुलांची प्रतिकारक क्षमता अधिक नसते , लॉकडाऊनमुळे बाहेरील खेळ बंद झाले आहेत. लहान मुलांना बाहेर सोडता येत नाही, त्याचा परिणाम होत आहे. लहान मुलाचं युद्ध पातळीवर लसीकरण करणे गरजेच आहे – डॉ.जयंत करंदीकर ,सदस्य रुग्णसेवा समिती .

कोरोना महामारीच्या काळात शैक्षणिक क्षेत्राचे विद्यार्थ्यांचे अंशतः नुकसान झालेले आहे. प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन आणि ऑनलाईन अध्यापन यात मर्यादा आहेतच. कोरनाचे संकट संपावे आणि पुन्हा वर्ग शाळेचा परिसर क्रीडांगण विद्यार्थ्यांनी गजबजून जावा. कोरनाच्या दुसऱ्या लाटेनंतर कोरनाची तिसरी लाट येऊ घातलेली आहे असे संकेत डीएचओ यांच्याकडून कालच सांगण्यात आले आणि यामध्ये लहान मुलांच्या आरोग्यास धोका असल्याबाबतची माहिती व सूचना त्यांच्या मुलाखतीत ऐकल्या. यावरून निश्चितच शाळा आणि शाळेचे प्रत्यक्ष कामकाज हे केव्हा चालू होईल याबाबत सांगता येणार नाही. प्राप्त परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील पाठ घटकांचे ऑनलाइनच्या माध्यमातून अध्यापन करण्याचा पर्याय सध्या तरी योग्य वाटतो
शिवराज वायचळ ,संस्थापक अध्यक्ष जिव्हाळा विद्यामंदिर

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: