आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मध्यस्थीनंतर भुसार आडत व्यापारी संघटनेचा बंद मागे

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मध्यस्थीनंतर भुसार आडत व्यापारी संघटनेचा बंद मागे After the mediation of MLA Vijaykumar Deshmukh, the closure of Bhusar Adat Traders Association was postponed

सोलापूर – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर भुसार आडत व्यापारी संघटनेने पुकारलेला बंद अखेर स्थगित करण्यात आला.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भुसार आडत व्यापाऱ्यांनी सोमवारपासून बंद पुकारला होता. तातडीने आमदार तथा बाजार समितीचे सभापती विजयकुमार देशमुख यांनी महानगर पालिकेचे उपायुक्त धनराज पांडे आणि व्यापाऱ्यांची बैठक घेतली.

यावेळी उपायुक्त धनराज पांडे यांनी व्यापाऱ्यांची म्हणणे ऐकून घेतले यानंतर सभापती विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी पोलीस प्रशासन, महापालिका आणि व्यापारी संघटनांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असे आश्वासन दिल्यानंतर भुसार आडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर विभुते यांनी बंद स्थगित करत असल्याची घोषणा केली.

सोमवारी २४/५/२०२१ रोजी दुकाने महानगर पालिका आयुक्त यांनी दिलेल्या वेळेत म्हणजेच सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरु राहतील असंही भुसार आडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर विभुते यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: