Mumbai Crime धक्कादायक: मुंबईत पोलीस स्टेशनात तरुणाने पेटवून घेतले; बेपत्ता पत्नी येताच…


हायलाइट्स:

  • पोलीस ठाण्यातच तरुणाने पेटवून घेतले.
  • पत्नीशी असलेल्या भांडणातून उचलले पाऊल.
  • मुंबईतील ताडदेव पोलीस ठाण्यात खळबळ.

मुंबई: घर सोडून गेलेली पत्नी पोलीस ठाण्यात आल्याचे समजताच पतीने पोलीस ठाण्यात जाऊन स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना ताडदेव पोलीस ठाण्यात आज घडली. पोलिसांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवत तरुणाला नायर रुग्णालयात दाखल केले. ( Mumbai Crime Latest Breaking News )

वाचा:ईडीच्या ‘त्या’ छापेमारीवर मलिक यांचे तातडीने स्पष्टीकरण; म्हणाले…

ताडदेव पोलीस कॉलनी येथे राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचे २०२० मध्ये लग्न झाले. एकत्रित कुटुंबात राहणाऱ्या या तरुणाचे पत्नीसोबत खटके उडू लागले. क्षुल्लक कारणावरून वारंवार भांडण होत असल्याने दोन दिवसांपूर्वीच पत्नी घरातून निघून गेली. बुधवारी या तरुणाने ताडदेव पोलीस ठाणे येथे जाऊन पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार केली. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत तिचा शोध सुरू केला.

वाचा:‘ते नेते भाजपमध्ये गेल्यावर…’; राष्ट्रवादी थेट ED कार्यालयात जाऊन विचारणार जाब

सदर विवाहितेचा शोध लागल्यानंतर आज तिला जबाब देण्यासाठी ताडदेव पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले. सायंकाळी ही विवाहिता जबाब देण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्याचे कळताच तिचा पती पोलीस ठाण्यात पोहचला. पोलीस ठाण्याच्या आवारात शिरण्याआधीच त्याने अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यानंतर पत्नीसमोर जात त्याने स्वत: ला पेटवून घेतले. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्वरित त्याच्या अंगावरील आग नियंत्रणात आणली. या घटनेत भाजल्याने जखमी झालेल्या या तरुणाला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याचे ताडदेव पोलिसांनी सांगितले.

वाचा:मुख्यमंत्रिपदाबाबतची ‘ती’ पोस्ट व्हायरल; एकनाथ शिंदे यांनी केला खुलासाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: