बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक संधी;’पीजीआयएम’चा ग्लोबल रिअल इस्टेट सिक्युरीटीज फंड


हायलाइट्स:

  • भारतात आत्तापर्यंत उपलब्ध नसलेली अनोखी संधी
  • अल्फा प्रकारातील परतावा दुहेरी स्वरुपात
  • कमी आकारात गुंतवणूकीची संधी

मुंबई : पीजीआयएम ग्लोबल सिलेक्ट रिअल इस्टेट सिक्युरीटीज फंडात प्रामुख्याने गुंतवणूक करणारी ‘पीजीआयएम इंडिया ग्लोबल सिलेक्ट रिअल इस्टेट सिक्युरिटीज फंड ऑफ फंड’ ही मुदतमुक्त श्रेणीतील फंडांचा फंड समभाग योजना पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांसाठी आणली आहे. हा फंड भारताचा पहिला जागतिक रिअल इस्टेट सिक्युरीटीज फंड आहे. योजनेचा एनएफओ गुंतवणूकीसाठी १५ नोव्हेंबर २०२१ ला खुला होणार असून २९ नोव्हेंबर २०२१ ला बंद होणार आहे.

दिलासा : पेट्रोल-डिझेलबाबत कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय
या फंडासाठी पायाभूत निर्देशांक एफटीएसई ईपीआरए एनएआरईआयटी हा विदेशी विकसित निर्देशांक राहणार आहे. रिटस् आणि जगातील विविध भागात कार्यरत असलेल्या बांधकाम कंपन्यांच्या समभागांमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करणारा पीजीआयएम ग्लोबल सिलेक्ट रिअल इस्टेट सिक्युरिटीज फंडाच्या युनिटमध्ये गुंतवणूक करत दीर्घ कालावधीत भांडवलवृध्दी मिळविणे हा या नवीन फंडाचा मुख्य उद्देश आहे. महामारीमुळे क्लाऊड कॉम्प्युटींग, दूरस्थ शाळा, दूरस्थ कार्यप्रध्दती, ई-कॉमर्स आणि रिटेलसारख्या क्षेत्रांमध्ये प्रचंड मागणी वाढताना दिसलेली आहे. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रासाठी प्रचंड वाढ विस्तारलेली आहे.

चांगली बातमी! आता तुम्ही स्वत: करु शकता आधारचे ऑफलाइन व्हेरिफिकेशन, जाणून घ्या
नवीन गुंतवणूक संधीबद्दल भाष्य करताना पीजीआयएम रिअल इस्टेटचे व्यवस्थापकीय संचालक आणि ग्लोबल रिअल इस्टेट सिक्युरिटीज बिझनेसचे प्रमुख रिक रोमॅनो म्हणाले की, आजच्या युगात गुंतवणूकीच्या संधी विविध श्रेणींमध्ये विस्तारलेल्या आहेत. ज्यात रिअल इस्टेटच्या वापरानुरुप होत जाणाऱ्या प्रवेग बदलांशी जोडल्या गेलेल्या अनुकूल गतीचा फायदा उठविणे, अल्प कालावधीसाठी पुर्नस्थापना आवश्यक असलेल्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणे आणि दीर्घ कालावधीत किंमतीत घसरण झालेल्या बाजारातील काही भागांमध्ये मुल्यवृध्दी हुडकून काढणे आदी श्रेणींचा समावेश आहे.

शेअर बाजारात तेजी; जिओजितची अनिवासी भारतीयांसाठी डीमॅट-ट्रेडिंग खाते सुविधा
पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित मेनन म्हणाले की, भारतीय गुंतवणूकदार आणि सल्लागारांसाठी समर्पक आणि काळानुरुप गुंतवणूक कल्पना आणणे हा आमचा प्रयत्न आहे. अशा गुंतवणक प्रकारात आमच्या पीजीआयएम या मुख्य संस्थेचे प्रावीण्य सादर करताना अभिमान वाटत आहे, असे त्यांनी सांगितले.

‘पद्मभूषण’साठी मी अपात्र! जाणून घ्या उद्योगपती आनंद महिंद्रा असं का म्हणाले…
जागतिक बाजारपेठेच्या तुलनेत गुंतवणूकयोग्य साधने म्हणून मोठ्या प्रमाणात अ दर्जाची व्यापारी मालमत्ता, भांडारगृहे, मालवाहतुक साठवणूक गृहे, रिटेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी आधारगृहे, शीतगृहे यासारखे विविध उप-प्रकार एकतर भारतात उपलब्ध आहेत किंवा नाहीत. आजच्या घडीला असलेला व्याजदर आणि चलनवाढ दराचा विचार करता हे गुंतवणूक धोरण पुढील काळासाठी ग्राहकांना आपल्या पोर्टफोलिओत लवचिकता निर्माण करण्याच्या रणनितीचा एक महत्वाचा जोड असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: