जळगावात दोन गटात तुंबळ हाणामारी: ३ जखमी; शासकीय रुग्णालयातही तोडफोड


जळगाव : चारचाकी वाहनाचा दुचाकीला धक्का लागल्याचं निमित्त होऊन जळगावात तणाव निर्माण झाला. या वादातून दोन गटात दुपारी १ वाजता मोहाडी परिसरात आणि नंतर सिव्हील हॉस्पिटलमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात रुग्णालयातही दोन्ही गट भिडल्याने रुग्णालयाच्या साहित्याची तोडफोड झाली आहे. या घटनेत आदील शेख शकील (वय १८), आतीक मोहम्मद सादीक (वय २१, रा. गणेशपुरी, मेहरुण) व सौरभ संतोष नन्नवरे (वय १९, रा. मोहाडी) असे तीन जण जखमी झाले आहेत.

मेहरुण भागात राहणारे आदिल व आतिक हे दोघे खासगी एजंटकडे वाहन पासिंग करण्याचं काम करतात. दोघे जण चारचाकी गाडीने मोहाडी रोड परिसरातील आरटीओ ट्रॅककडे जात होते. यावेळी डी मार्टच्या समोर सौरभच्या दुचाकीस चारचाकीचा धक्का लागला. या कारणावरुन तिघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानतंर तिघे तिथून निघून गेले. थोड्या वेळाने सौरभ हा १५ ते २० तरुणांना घेऊन ट्रॅककडे गेला.

Mumbai Crime धक्कादायक: मुंबईत पोलीस स्टेशनात तरुणाने पेटवून घेतले; बेपत्ता पत्नी येताच…

या तरुणांनी लाकडी दांड्यांनी आदिल व आतिक या दोघांना बेदम मारहाण केली. भांडण सोडवणाऱ्या नजीर शेख यालाही मारहाण केली. या मारहाणीत आतिक बेशुद्ध पडला होता. याचवेळी शेख यांच्या गटातील काही तरुणांनी देखील सौरभला मारहाण केली. यात तिघे जण जखमी झाले. नागरिकांनी हे भांडण मिटवल्यानंतर दोन्ही गाटातील तीन जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयातही धुमश्चक्री

उपचार सुरू असताना दोन्ही गटातील तरुण पुन्हा रुग्णालयात समोरासमोर आले. या जमावाने थेट रुग्णालयातील साहित्याची तोडफोड केली. दोन्ही गट आक्रमक झाल्याने दोन डॉक्टर देखील वेठीस धरले गेले. सुमारे २० मिनीटे सुरू असलेल्या या प्रकारामुळे रुग्णालयात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या दोन्ही गटांना शांत करण्यासाठी मोहाडी येथील धनंजय सोनवणे यांनी प्रयत्न केले. तसंच मणीयार बिरादरीचे फारुख शेख, मनसेचे अॅड. जमील देशपांडे हे देखील संतप्त तरुणांना समजावण्यासाठी रुग्णालयात थांबून होते. काही वेळातच पोलिसांनी रुग्णालयात येऊन जमाव पांगवला. यानंतर जखमींवर उपचार करण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: