धक्कादायक! पत्नी मुलांसह भाऊबीजेला माहेरी गेली आणि त्याने…


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

भाऊबीजेच्या निमित्ताने पत्नी मुलांसह माहेरी गेलेली असताना घरात एकटा असलेल्या जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयत व रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने सोमवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पत्नी आज बुधवारी (दि.११) रात्री घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. जतीन जयप्रकाश चांगरे (वय ४०, नेहरुनगर) असे मृताचे नाव आहे. (An employee of Jalgaon Government Hospital committed suicide)

जतीन चांगरे शासकीय रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून कार्यरत होते. भाऊबीजेसाठी शुक्रवारी (दि.५) त्यांच्या पत्नी सुमित्रा, मुले प्रतिक व कुंकुम असे तीघे मनमाड येथे माहेरी गेले होते. जतीन चांगरे या दरम्यान नवलनगरात राहणाऱ्या वडीलांकडे जेवणासाठी जात होते. आठ नोव्हेंबर रोजी जतीन यांनी दुपारी दोन वाजेपर्यंत ड्युटी केली. रात्री शनिपेठेत राहणाऱ्या काकांकडे जेवण केले. यानंतर ते नेहरुनगर येथे घरी आले होते. रात्रीतून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी व बुधवारी ते ड्युटीवर गेले नाही.

क्लिक करा आणि वाचा- गटबाजी की हलगर्जीपणा?; बहुमतात असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘असा’ झाला पराभव

घराचा दरवाजा होता आतून बंद

काल बुधवारी रात्री ११ वाजता त्यांच्या पत्नी भावासह घरी आल्या. यावेळी आतून दरवाजा बंद होता. खिडकीतून आत हात टाकुन मुख्य दरवाजा उघडला. वरच्या मजल्यावरील खोलीतून देखील प्रतिसाद येत नसल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता जतीन यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले. हे दृष्य पाहुन पत्नी, शालक यांना धक्का बसला.

क्लिक करा आणि वाचा- सतेज पाटील यांच्या विरोधात महाडिक की आवाडे?; शुक्रवारी फैसला

मृतदेह कुजलेला

दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आत्महत्या केलेली असल्यामुळे घरात दुर्गंधी पसरली होती. या घटनेमागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन केल्यांनतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत जतीन यांच्या पश्चात वडील जयप्रकाश चांगरे, हितेंद्र व खूशाल दोन भाऊ, पत्नी सुमित्रा, मुलगा प्रतिक आणि मुलगी कुंकुम असा परिवार आहे.

क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज दैनंदिन रुग्णसंख्या घटली; सक्रिय रुग्णसंख्याही होतेय कमीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: