BCCI मोठा निर्णय घेणार; विराटच्या गैरहजेरीत रहाणे नव्हे तर ‘हा’ होणार कसोटी कर्णधार


नवी दिल्ली: न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. टी-२० मालिकेनंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका देखील होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच होणार आहे. दोन सामन्यांच्या या मालिकेत संघातील काही सिनिअर खेळाडूंना विश्रांती दिली जाणार असल्याचे कळते यामध्ये कर्णधार विराट कोहलीचा देखील समावेश आहे.

वाचा-ज्याच्यामुळे पराभव झाला असता तोच ठरला सुपरहिरो; ७ चेंडूत विस्फोटक फलंदाजी

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार कर्णधार विराट कोहली कानपूर येथे होणारी पहिली कसोटी खेळू शकणार नाही असे कळते. कोहली डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या मुंबईतील कसोटीपासून संघाची सूत्रे हाती घेणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर यांना देखील या मालिकेत विश्रांती दिली जाईल. त्याच बरोबर विकेटकीपर आणि ऋषभ पंत याला बाबो बबलमधील थकव्यामुळे कसोटी मालिकेतून बाहेर ठेवले जाईल.

वाचा- स्वत:च्या देशाचा शत्रू झाला हा क्रिकेटपटू; म्हणाला, पाकिस्तान…

विराट संघात नसल्याने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत कर्णधार कोणाला करायचे असा प्रश्न निवड समिती समोर आला आहे. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे ही दोन नावे आघाडीवर आहेत. पण टी-२० मध्ये विराटचा उत्तराधिकारी म्हणून रोहितची निवड झाल्यानंतर आणि रहाणेचा गेल्या काही वर्षातील फॉर्म लक्षात घेता निवड समिती आणि मुख्य कोच राहुल द्रविड हे देखील विचारात पडले आहेत.

वाचा- Video: बेयरस्टोची एक चूक इंग्लंडला महागात पडली; याच गोष्टीमुळे न्यूझीलंडने २०१९चा वर्ल्डपक गमावला

बोर्डाच्या मते विराट कोहली हा कसोटीचा कर्णधार असेल. अजिंक्य रहाणे, ऋद्धीमान सहा या पर्यायांसह संघ निवडावा अशी निवड समितीची योजना आहे. आंध्र प्रदेशकडून खेळणाऱ्या केएस भरत याचा देखील समावेश केला जाऊ शकतो.

वाचा- न्यूझीलंड संघाने केला अनोखा विक्रम; सलग तिसऱ्यांदा ICCच्या…

खेळाडूंना ब्रेक

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी जयपूरमध्ये एकत्र येण्याआधी खेळाडूंना बायो बबलमधून छोटा ब्रेक देण्याचा विचार केला जात आहे. वर्ल्डकपमधील खेळाडू आणि सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतील खेळाडूंना कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी ब्रेक दिला जाऊ शकतो. हा ब्रेक २ किंवा ३ दिवसांचा असू शकतो. आफ्रिकेच्या दौऱ्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: