बांधकाम मजुराला डॉ नीलम गोऱ्हे यांचे प्रयत्नानंतर तात्काळ मिळाले पैसे

बांधकाम मजुराला डॉ नीलम गोऱ्हे यांचे प्रयत्नानंतर तात्काळ मिळाले पैसे construction worker got the money immediately after efforts of Dr.Neelam Gorhe
  पुणे /मुंबई - बांधकाम मजुराला त्याच्या पत्नीच्या शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी बांधकाम महामंडळाकडून डॉ नीलम गोऱ्हे यांचे प्रयत्नानंतर रु २००००/ - तात्काळ मिळाले. मौजे दिघंची तालुका आटपाडी,जिल्हा सांगली येथील राहुल लोणकर हे सेन्टरिंगचे काम करतात . गेल्यावर्षी राहुल यांचे पत्नीचे सीझर शस्त्रक्रियेद्वारे बाळंतपण झाले होते.त्याची पत्नी घरकाम करते.राहुल हा बांधकाम मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे .त्याने सीझरचा झालेला खर्च मंडळाच्या वेबसाईटवर टाकला होता .अनेक ठिकाणी प्रयत्न करून ही त्याला पैसे मिळाले नव्हते. म्हणून त्याने डॉ नीलम गोऱ्हे यांना संपर्क साधून आपली व्यथा सांगितली.

बांधकाम कामगारांचे प्रश्नांबाबत डॉ गोऱ्हे यांनी मंत्री कामगार यांच्याबरोबर बैठका घेतल्या त्या मध्ये बांधकाम कामगारांना मंडळाच्या सुविधा लवकरात लवकर मिळाव्यात म्हणून निर्देश दिले होते.त्यानुसार राहुल लोणकर यांच्या प्रकरणात डॉ गोऱ्हे यांनी पाठपुरावा केला.त्यामुळे श्री लोणकर यांना रु २००००/ - मंडळामार्फत त्यांचे खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.त्याबद्दल डॉ  गोऱ्हे यांचे आभार राहुल लोणकर यांनी मानले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: