कोरोनामुक्त सौंदणे युवकांचा निर्धार

कोरोनामुक्त सौंदणे युवकांचा निर्धार Determination of corona-free saundane youth
    पंढरपूर - जगभरासह महाराष्ट्रात कोरोनाचा  दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागात शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.अशात कोरोनामुक्तच्या लढाईत आता सौंदणे जि सोलापूर या गावातील तरुणाई एकवटली आहे. 

 विविध ठिकाणी नोकरी करणार्‍या गावातील नोकरदार ग्रुपच्यावतीने फ्रंटलाईन वर्कर यांना सॅनिटायझर ,मास्क यांचे वाटप करण्यात आले आहे.गावात वारंवार हायड्रोक्लोरिकची फवारणी करण्यात येत आहे. गावातील रोजंदारीवर जाणारे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना लॉकडाऊनच्या काळात अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. आज 30 कुटुंबाला किट वाटप करण्यात आले. महत्वाचे म्हणजे कोणत्याही लाभार्थीच्या अन्नधान्याचा किट देताना फोटो घेतला गेला नाही. कोणताही दिखाव्याचा कार्यक्रम न करता कोरोनाचे नियम पाळण्याच्या दृष्टीने लाभार्थ्यांना  अन्नधान्याचे किट घरपोच देण्यात आले .

सौंदणे गाव आज जरी प्रतिबंधित क्षेत्र असले तरी ते लवकरच पूर्ण कोरोना मुक्त करण्याचा निर्धार या तरुणांनी गावकर्‍यांच्या सहाय्याने केला आहे. तरुणांच्या इच्छाशक्तीमुळे गाव लवकरच कोरोना मुक्त होईल – पोलिस नाईक गजानन माळी ,पंढरपूर तालुका पोलीस ठाणे

वरील सर्व कामे युवक वर्गणीतून करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: