गोफणगुंडा टोलनाका
टोलनाका
खाजवल तर खाजते
वाजवल तस वाजते
कुजवल तर कुजते
माजवल तर माजते
पळवल तर पळते
साधलं तसं फुलते
नाहीतर राख करते
तेच तर राजकारण असते !!

गोफणगुंडा
आहेत सारेच सोबती
साखरही लाजते त्यांच्या बोलण्याला
ते इतुके निगरगट्ट
चुकत नाहीत कपट कारस्थानाला !!१!!
त्यांचं वागणं इतुके नाटकी
समक्ष बोलणं कठीण आजला
ते इतुके चतुर त्यांच्याशिवाय
कोण जाणतो त्यांच्या विकृतीला!!२!!
त्यांची दांभिकता लाजवते सर्व नटसम्राटांना
उघडे पडताच हात झटकून
मोकळे त्याच क्षणाला!!३!!
ते प्रामाणिक त्यांच्या दुहेरी भूमिकेला
अब्रूच नाही जमेला चाड
कोठे त्यांच्या वागण्याला !!४!!
ते निष्णात टाळूवरचे लोणी खाणारे
कोणाचे भय त्यांना
ते बेमालूम पक्के तेच सत्तेत
इतरांची माती करण्या कोण रोखतो त्यांना!!५!!
आनंद कोठडीया,जेऊर ता करमाळा
९४०४६९२२००
