या चुकीच्या निर्णयाची त्यांना किंमत मोजावी लागणार – जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख

या चुकीच्या निर्णयाची त्यांना किंमत मोजावी लागणार – जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख They will have to pay price for this wrong decision – Prabhakar Deshmukh, Founder President of Janhit Shetkari Sanghatana

टेंभुर्णी – भिमानगर येथे उजनी धरणावरती महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेले धरणे आंदोलनाचा आज 16 वा दिवस आहे .अद्याप या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे निषेध व्यक्त केला जात आहे.

यावेळी केली बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धरणातील पाण्याचा अभ्यास करून इंदापूरला जाणाऱ्या ५ टीएमसी पाण्याला मंजुरी द्यायला पाहिजे होती.या चुकीच्या निर्णयाचा सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेला त्याची किंमत मोजावी लागणार आहे .शिवसेनेबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरलेली आहे ,त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जलसंपदा सचिवां बरोबर तातडीची बैठक लावून शासनाने खरी माहिती घेऊन मंजूर केलेले ५ टीएमसी पाणी त्वरित रद्द करून जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनस्थळी लेखी पत्र देऊन कळवावे.अन्यथा आंदोलन सुरूच राहील.आंदोलनाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली आहे.वेळ आली तर अधिकाऱ्यांच्या अंगावरील कपडे फाडून त्यांची धिंड काढण्यात येईल असा इशारा ही देशमुख यांनी दिला आहे.

यावेळी रयत क्रांतीचे प्रा.सुहास पाटील बोलताना म्हणाले ५ टीएमसी सांडपाणी उजनी धरणात येतच नाही तरीपण बेकायदेशीररित्या मंजुरी दिली कशी दिली याचे उत्तर शासनाने आंदोलनकर्त्यांना दिले पाहिजे अन्यथा भविष्यात हे आंदोलन उग्र स्वरूप धारण करेल .

यावेळी निषेध सभेत बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर,किसान युवा क्रांतीचे प्रतापसिंह चंदनकर व प्रहारचे दत्ता व्यवहारे यांनी जाहीर निषेध व्यक्त करून शासनावर नाराजी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: