बाहुबली आण्णासो पाटील यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आहारदान

बाहुबली आण्णासो पाटील यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आहारदान Food donation on occasion of Bahubali Annaso Patil’s wedding anniversary

सांगली,26/05/2021- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या फंगसच्या संकटात सर्वसामान्य भरडून निघत आहे. अशातच व्यवसाय ठप्प झाल्याने नागरिकांचे आरोग्य आणि आर्थिक गणित बिघडले असतानाही बाहुबली आण्णासो पाटील व सौ अर्चना बाहुबली पाटील,हार्दिक ग्रीन एकर्स,धामणी रोड सांगली यांनी त्यांचे लग्नाचे वाढदिवसानिमित्त इतरत्र खर्च न करता आज दि २६-५-२०२१ रोजी राजमती ट्रस्ट संचलित भगवान महावीर कोविड सेन्टरला, सेन्टरचे मुख्य समन्वयक सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील यांच्याकडे एक दिवसाच्या आहाराकरिता रुपये १५०००/- चा चेक बाहुबली आण्णासो पाटील यांची कन्या कु श्रावी बाहुबली पाटील हिने सुपूर्द केला.

या कौतुकास्पद कार्याबद्दल उभयतांचे भगवान महावीर कोविड सेन्टरचे मुख्य समन्वयक सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील यांच्यासह  सर्व स्तरातून हार्दिक आभार व धन्यवाद देण्यात येत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: