शेतकऱ्यांची फसवणूक केलेल्या जलसंपदामंत्री जयंत पाटलांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा – प्रभाकर देशमुख
शेतकऱ्यांची फसवणूक केलेल्या जलसंपदामंत्री जयंत पाटलांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा – प्रभाकर देशमुख File a case of fraud against Water Resources Minister Jayant Patil who cheated farmers – Prabhakar Deshmukh

कुर्डुवाडी/राहुल धोका,26/05/2021 – भिमानगर येथील उजनी धरणाच्या मेन गेट वरती सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाचे 5TMC पाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेकायदेशीररित्या पळविले आहे ते त्वरित रद्द करावे या मागणीसाठी चालु असलेल्या जनहित शेतकरी संघटनेचे आंदोलनाची दखल घेऊन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मिडियासमोर उजनी धरणातील 5TMC पाणी शासनाने इंदापूर तालुक्याला देण्याचे मंजूर केले होते ते आम्ही रद्द केले आहे असे सांगून कोणतेही लेखी पत्र न देता तोंडी सांगून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व आंदोलनकर्त्यांची स्पष्ट फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर त्वरित फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रभाकर देशमुख यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे .
यावेळी बोलताना जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख म्हणाले कि, राज्याचे जबाबदार जलसंपदामंत्र्यांनी राज्यातील लाखो शेतकऱ्यां समोर मिडीयामध्ये धांदात खोटे बोलून आंदोलन कर्त्यांना लेखी पत्र न देणं कितपत योग्य आहे हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीच ठरवावे व या शेतकऱ्यांच्या गंभीर विषयात लक्ष घालावे अन्यथा टेंभुर्णी पोलीस स्टेशन समोर १ जुन रोजी हलगीनाद आंदोलन करण्यात येईल असे सांंगितले.
सदरचे निवेदन आंदोलनस्थळी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सहा.पो.निरीक्षक अमित शितोळे यांनी स्वीकारले . यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन बापु जगताप,प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे, रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.सुहास पाटील सर,विठ्ठल आबा मस्के,सचिन पराडे पाटील ,रामदास खराडे,मल्हारी गवळी,प्रशांत महाडिक, धवल पाटील,मंगेश वाघ,दादासो गायकवाड, अतुल भालेराव,अंकुश महाडिक, नारायण गायकवाड, तानाजी गायकवाड, सचिन गायकवाड,सिध्दार्थ भास्कर, दत्ता आरकिले, विजयराजे खराडे,संजय नवले,श्रीराम महाडिक, सौरभ आरकिले,अमोल पाटील,अकोले बु.चे सरपंच सतीश सुर्वे, उपसरपंच बशीर मुलाणी, ग्रां.प.सदस्य कल्याण नवले,रमेश पवार,तुषार पाटील,सुजीत दरगुडे आदी उपस्थित होते.
बेंबळे जि.प.सदस्य बंडू नाना ढवळे यांनी जि.प. गटातील १५ ग्रामपंचायतीचे ठराव सरपंचासह उजनी धरणावरील चालु असलेल्या आंदोलनास प्रत्यक्ष जाऊन पाठींबा दिला यावेळी आंदोलन कर्त्यांकडून त्यांचे आदर्श जि.प.सदस्य म्हणून कौतुक करण्यात आले.