कोविडच्या काळात सर्वांनी मदतीसाठी पुढे येणे गरजेचे – आमदार समाधान आवताडे

कोविडच्या काळात सर्वांनी मदतीसाठी पुढे येणे गरजेचे – आ.समाधान आवताडे यांचे आवाहन In covids time, everyone should come forward for help – MLA Samadhan Awatades appeal
 पंढरपूर - पंढरपूर - मंगळवेढा मतदार संघात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वजण खूप मोठ्या विळख्यात अडकलो आहोत. त्यामुळे कोरोनाच्या या प्रकोपात सर्वांनी एकमेकांना मदतीसाठी पुढे सरसावले पाहिजे ,असे आवाहन पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे नूतन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.

पंढरपूर तालुक्यातील गादेगांव येथील कोविड केअर केंद्रास भेट देवून आ.समाधान आवताडे यांनी व्यक्तिगत स्वरूपात अर्थिक मदत केली. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. सद्य काळातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सर्वांनी एकजुटीने व एकदिलाने कार्य करून सामूहिक प्रयत्नांनी या महामारीचा सामना करावयाचा आहे. त्या अनुषंगाने समाजातील दानशूर व्यक्तींनी आपापल्या परीने निरनिराळ्या मार्गांनी मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले.

 गादेगांव येथील कोविड केअर केंद्रास आमदार आवताडे यांनी भेट देवून तेथील आरोग्यअधिकारी ,कर्मचारी यांच्याशी विविध आरोग्य विषयक मुद्द्यांवर चर्चा करून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्याचबरोबर तेथील उपलब्ध उपचार सेवा आणि इतर आरोग्य सोयीसुविधा याबद्दल आमदार समाधान आवताडे यांनी रुग्णांशी चर्चा केली.

   यावेळी सरपंच कु.ज्योती विष्णू बाबर,माजी सरपंच महादेव बागल,आरोग्य अधिकारी डॉ. तांबोळी मॅडम,स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष तानाजी बागल,अविनाश मोरे, ग्रामपंचायत सदस्य मोहन बागल, महादेव फाटे, धनंजय बागल, पिंटू कळसुले, सचिन हुंडेकरी, स्वागत फाटे,सचिन बागल,शांतीनाथ बागल,डी. बिल्डरचे दत्ता बागल,विकास बागल,आण्णा फाटे,गणेश फाटे,हरी बंदपट्टे,उद्धव बागल, अजिनाथ नागणे,कोळी,गाडेकर सिस्टर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: