पंढरपूर येथील वर्षे 60 वरील जेष्ठ नागरिकांचे प्रथम डोससाठी कोविड 19 लसीकरण नांव नोंदणी सुरू

पंढरपूर शहर हद्दीतील वय वर्षे 60 पेक्षा जास्त असणाऱ्या सर्व जेष्ठ नागरिकांचे प्रथम डोससाठी कोविड 19 लसीकरण नांव नोंदणीकरण केंद्र सुरू Registration of covid 19 vaccination for senior citizens above 60 years of age at Pandharpur begins
 पंढरपुर शहरातील सर्व नागरिकांसाठी उद्या दि 28 मे 2021 पासून सकाळी 8।30 ते 11।30 या वेळेत पंढरपुर शहर हद्दीतील वय वर्षे 60 पेक्षा जास्त असणाऱ्या सर्व जेष्ठ नागरिकांना ज्यांचा कोवीड लसीकरणाचा पहिला डोस झालेला नाही त्यांचासाठी कोविड 19 लसीकरण नांव नोंदणी करणेकरिता पंढरपुर शहर हद्दीतील (1)कवठेकर प्रशाला, नाथ चौक (2)आदर्श प्राथमिक विद्यालय, वेदांत भक्त निवास समोर (3) द.ह.कवठेकर प्रशाला, तालुका पोलीस स्टेशन मागे,(4) कर्मयोगी विद्या निकेतन, लिंक रोड,पंढरपुर या चार ठिकाणी नांव नोंदणी केंद्र उभारण्यात आले आहेत. तरी पंढरपूर शहर हद्दीतील वय वर्षे 60 पेक्षा जास्त  वय असलेल्या ज्या नागरिकांनी प्रथम डोस घेतलेला नाही त्यांनी वरील चार केंद्रावर जाऊन आपले लसीकरण करणेसाठी नांव नोंद करावी. नांव नोंदणी करण्यास जाताना आपले स्वतःचे आधारकार्ड, मोबाईल नंबर घेऊन जावे. ज्या नागरिकांनी प्रथम डोस घेतलेला नाही अशाच नागरिकांनी आपल्या नांवाची नोंदणी करावी.  आपणास नंबरनुसार टोकन देण्यात येईल.

लसीकरण केंद्रावर खालीलप्रमाणे टोकन नंबर देण्यात येत आहेत.

(1)कवठेकर प्रशाला, नाथ चौक,पंढरपूर –
टोकन क्र 1 ते 100
टोकन क्र 401 ते 500
टोकन क्र 801 ते 900

(2) आदर्श प्राथमिक विद्यालय, वेदांत भक्त निवास समोर,पंढरपूर –
टोकन क्र 101 ते 200
टोकन क्र 501 ते 600
टोकन क्र 901 ते 1000

(3) द.ह.कवठेकर प्रशाला, तालुका पोलीस स्टेशन मागे, पंढरपूर –
टोकन क्र 201 ते 300
टोकन क्र 601 ते 700
टोकन क्र 1001 ते 1100

(4) कर्मयोगी विद्या निकेतन,लिंक रोड,पंढरपूर –
टोकन क्र 301 ते 400
टोकन क्र 701 ते 800
टोकन क्र 1101 ते 1200

तरी नागरिकांनी लसीकरण नोंदणी केंद्रावर गर्दी न करता आपल्या जवळील केंद्रावर आपल्या सोई नुसार आपली कोविड 19 लसीकरण नांवाची नोंद करावी.नोंद झाल्यानंतर आपले टोकन सांभाळून ठेवावे.नागरिकाचा ज्या दिवशी कोविड 19 लसीकरणाचा नंबर येईल त्याच्या एक दिवस अगोदर नागरिकाच्या मोबाईल नंबरवर पंढरपूर नगर परिषदेमार्फत sms केला जाईल. त्या sms मध्ये नागरिकाचे नांव, कोविड 19 लसीकरणाचा दिनांक,वेळ नमूद असेल. त्यानुसारच नागरिकांनी लस घेणेसाठी अरिहंत पब्लिक स्कूल,मनीषा नगर, पंढरपूर या ठिकाणी उपस्थित राहावे.

लस घेण्यासाठी जाताना आपले टोकन आणि आधारकार्ड सोबत ठेवावे पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर यांनी कळविले आहे.

          महत्त्वाची सूचना 

प्रत्येक नागरिकांना एकच टोकन मिळेल. जे जेष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर येऊ शकणार नाहीत अशा ज्येष्ठ व्यक्तीच्या घरातील व्यक्ती आधार कार्ड घेऊन नावांची नोंदणी करू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: