लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक विवेक परदेशी

लायन्स क्लब पंढरपूरच्या पदाधिकारी निवडी जाहीर Pandharpur Municipal Councilor Vivek Pardeshi is the President of Lions Club
   पंढरपूर - लायन्स क्लब ऑफ पंढरपूरची २०२१-२२ ची पदाधिकारी व कार्यकारिणी निवड नुकतीच संपन्न झाली.मावळत्या अध्यक्षा डॉ.सौ. सुजाता गुंडेवार यांनी या निवडी जाहिर केल्या.

  लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी पंढरपूर नगर पालिकेचे नगरसेवक विवेक परदेशी यांची एकमताने निवड करण्यात आली. सचिवपदी ललिता कोळवले जाधव यांची,खजिनदारपदी मनोविकारतज्ञ डॉ.ऋजुता गोळवलकर उत्पात व प्रथम उपाध्यक्ष म्हणून डॉ.मृणाल गांधी यांची निवड करण्यात आली. 

      नागरिकांमधील खरी गरज शोधुन ती पूर्ण करण्याचे काम लायन्स क्लब इंटरनॅशनल या सामाजिक संस्थेव्दारा करण्यात येते.लायन्स संस्था गेली कित्येक वर्षे सामाजिक मदतकार्य करत आहे. पंढरपूरमध्ये लायन्स क्लब संचलित शहीद मेजर कुणालगिर गोसावी अंधशाळा,लायन्स क्लब पंढरपूर संचलित नेत्र रुग्णालय तसेच अंधांसाठी पोस्टल ब्रेल लायब्ररी असे कायमस्वरूपी प्रकल्प लायन्स संस्था राबवत आहे. नुतन सदस्य आगामी वर्षामध्ये सामाजीक कार्यामध्ये आपला ठसा उमटवतील तसेच लायन्स संस्थेचा सेवेचा वारसा नुतन सदस्य निभावतील असा विश्वास सर्व लायन्स सदस्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. 

     पंढरपुरातील नागरिक व विशेष पदाधिकारी यांनी तसेच लायन्स संस्थेचे डिस्ट्रिक्ट तसेच मल्टिपल पदाधिकाऱ्यांनी नूतन सदस्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: