पुरग्रस्त निधीपासून वंचित असणाऱ्या व्यापाऱ्यांना तत्काळ मदत मिळावी- राष्ट्रवादी काँग्रेस
पुरग्रस्त निधीपासून वंचित असणाऱ्या व्यापाऱ्यांना तत्काळ मदत मिळावी- राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवेदनाद्वारे शासनाकडे केली मागणी Traders deprived of flood relief funds should get immediate help – NCP
पंढरपूर ,विजय काळे – पंढरपूर शहरात २०२० साली आलेल्या महापुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले.नदीकाठच्या लोकांची ज्याप्रमाणे घरांचे नुकसान झाले त्याच प्रमाणे त्या भागातील व्यापारी बंधूंचेही नुकसान झाले.शासनाने या संदर्भात तात्काळ पुरग्रस्त कुटुंबास मदत जाहिर करुन पंचनामे करण्याचे आदेश दिले. घरांचे पंचनामे व व्यापाऱ्यांच्या दुकांनाचेही पंचनामे करून व्यावसायिकांची पूर्ण कागदपत्रे पंचनाम्यात जोडूनही अनेक व्यापाऱ्यांना अद्यापही पूरग्रस्त निधी मिळालेला नाही.
त्यामुळे पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पूरग्रस्त निधीपासून वंचित असणाऱ्या व्यापाऱ्यांना तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा. कारण सध्या लॉकडॉऊनमुळे व्यापारी बांधव हतबल झाले आहेत.अशा अडचणीच्या काळात शासनाने पुरात झालेल्या नुकसान भरपाई द्यावी अशा मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर भोसले,उपाध्यक्ष गिरिष चाकोते,सरचिटणिस दत्तात्रय माने,गणेश साळुंखे,आण्णा पोपळे,प्रकाश वाळके,मंगेडकर यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.