पदोन्नतीमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर आंदोलन – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

पदोन्नतीमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर आंदोलन – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले Republican statewide agitation for reservation in promotion – Union Minister of State Ramdas Athawale
     मुंबई दि.28 - पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा या मागणीसाठी येत्या दि.1जून ते 7 जूनपर्यंत रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. 

महाविकास आघाडी सरकार स्वतःला पुरोगामी म्हणणारे सरकार असले तरी पदोन्नती मधील मागसावर्गीयांच्या आरक्षण प्रश्नी महाविकास आघाडीचा बुरखा फाटला असून हे सरकार दलित विरोधी सरकार ठरले आहे. मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरीत घ्यावा या मागणीसाठी राज्यभर प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालया वर दि.1 जून ते 7 जूनपर्यंत रिपाइंतर्फे आंदोलन सप्ताह जाहीर करण्यात आला आहे.

  या आंदोलनात कोरोना प्रसाराचे नियम पाळून गर्दी न करता आंदोलन करण्याच्या सूचना ना. रामदास आठवले यांनी दिल्या आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: