भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वाफारा मशीनचे वाटप

भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाच्यावतीने वाफारा मशीनचे वाटप Distribution of Wafara Machine on behalf of Bharatiya Janata Party Minority Front
   फलटण - फलटण,जि.सातारा येथे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाच्यावतीने माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वार्ड क्रमांक दहा मध्ये वाफारा मशीनचे वाटप नगरसेवक व भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप शहा फलटण, शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष नितीन जगताप, अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष रियाज इनामदार यांच्या हस्ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या आवश्यक असलेल्या वाफारा मशीनचे वाटप करण्यात आले.  

     यावेळी फलटण नगरपरिषदेचे गटनेते व नगरसेवक अशोक जाधव,फलटण शहर भाजपचे अध्यक्ष अमोल सस्ते, सातारा जिल्हा भाजपचे अध्यक्ष जयकुमार शिंदे,भटक्या विमुक्त जाती जमातीचे अध्यक्ष सुनील जाधव,भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष बजरंग नाना गावडे,तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष नानासो इवरे ,माजी नगरसेवक प्रवीण आगवणे, युवा नेते राहुल शहा, राजकुमार देशमाने ,निलेश चिंचकर, माऊली अडसूळ,किरण जाधव,मंगेश करणे,सागर मुळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: