जादा रुग्णसंख्येच्या गावांत कोरोना चाचणीवर भर द्या- मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी

जादा रुग्णसंख्येच्या गावांत कोरोना चाचणीवर भर द्या- मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी Emphasize corona testing in villages with high patient population – Chief Executive Officer Dilip Swamy
   पंढरपूर दि.28: जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांना गावांतच उपचार मिळावेत यासाठी गावागावांत लोकसहभागातून कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. पंढरपूर तालुक्यातील मौजे तावशी तसेच 65 एकरवरील कोविड केअर सेंटरला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी भेट देवून सोयी सुविधांची पाहणी केली. 
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला
कोविड केअर सेंटरचा आढावा
   जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी मौजे तावशी व 65 एकरमधील कोविड केअर सेंटर्सची पाहणी केली आणि तेथील डॉक्टर्स व कर्मचारी तसेच दाखल कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधून तेथील व्यवस्थेची पाहणी केली. 

    65 एकर येथील कोविड केअर सेंटर येथे मानसिक ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळेतही त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी सर्व यंत्रणा उत्तम काम करीत असून येथील व्यवस्था व पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा व घेण्यात येणाऱ्या काळजी बद्दल रुग्णांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी तालुकास्तरीय यंत्रेणेचा आढावा घेताना दिलीप स्वामी म्हणाले,प्रत्येक गावांत ग्रामस्तरीय समित्या सक्रीय कराव्यात.मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा त्वरित शोध घेवून तपासणी करा. कोणताही कोरोना बाधित रुग्ण घरी उपचार घेणार नाही याची दक्षता घ्या. प्रत्येक कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे.जादा रुग्णसंख्या असलेल्या गावांत जास्तीत जास्त नागरिकांची कोरोना चाचणी करण्यावर भर द्या, अशा सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी दिल्या.

 प्रांताधिकारी सचिन ढोले,गटविकास अधिकारी रविकिरण घोडके,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम,डॉ.जानकर, बाळासाहेब धोंडीबा यादव तावशी आदी उपस्थित होते.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: