शैक्षणिक संस्थांच्या शिक्षण शुल्काबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक

शैक्षणिक संस्थांच्या शिक्षण शुल्काबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक Nationalist Students Congress is aggressive about tuition fees of educational institutions
  पंढरपूर / नागेश आदापूरे - राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,महाराष्ट्र प्रदेशच्या आदेशानुसार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाच्या वतीने पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व कॉलेजेसला निवेदन देण्यात आले.
या निवेदनात खालील मागण्या केल्या आहेत –

१.सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचा मान ठेवत आपण आपल्या शिक्षण शुल्कात(Tuition Fee)सरसकट कपात करावी. त्याचबरोबर विदयार्थी ज्या सुविधा वापरत नाहीत (Library, Laboratory,Internet,Development,Gymkhana, Education Tour, Annual Functions, etc.)त्याचे शुल्क आकारू नये.

२.ज्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे शुल्क राहिले असेल त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षेपासून अथवा शिक्षणापासून वंचित ठेवू नये. तसेच त्याला शाळा- महाविद्यालय सोडण्यास भाग पाडू नये. (विद्यार्थी आज ना उद्या आपले पैसे देणार आहेत. तोपर्यंत त्याची महत्वाची कागदपत्रे आपल्याकडेच राहणार आहेत.)

३.नर्सरी ते १० वी चे शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थानी शैक्षणिक साहित्य(पुस्तके,वह्या इ.) शाळेतूनच घ्यावे लागतील ही सक्ती करु नये. तसेच बोर्डाने(CBSE,ICSE,STATE)जी पुस्तके निर्देशित केली आहेत तीच पुस्तके शिकवताना वापरावीत.दुसऱ्या कोणत्याही प्रकाशनाची महाग पुस्तके पालकांना घेण्यास भाग पाडू नये.कारण संबंधित बोर्डाकडे तक्रार गेल्यास सदर संस्थेवर कारवाई होऊ शकते.

     यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष सागर पडवळ, कार्याध्यक्ष राकेश साळुंखे,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पंढरपूर शहर,कार्याध्यक्ष अमृता शेळके, उपाध्यक्ष ओंकार जगताप,शुभम साळुंखे, सरचिटणीस ओंकार शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यातील अनेक शिक्षण संस्था या सत्ताधारी पक्षाच्या ताब्यात आहेत त्यामुळे त्यांनी शिक्षण शुल्क आकारणी कमी केली तर तो इतर शिक्षण संस्थांसमोर आदर्श होईल आणि त्यांना ही हे शुल्क कमी करावेच लागेल अशी प्रतिक्रिया जनसामान्यातून व्यक्त केली जात आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: