दारूने केला घात,मात्र आरोपींपर्यंत पोहचले पंढरपूर ग्रामीण पोलिसांचे हात

दारू पिवुन शिवीगाळी करीत असल्याने काढला कायमचा काटा Removed a permanent thorn from drinking and abusing

पंढरपूर – पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हदीतील मौजे जैनवाडी ता.पंढरपुर येथील पोपट एखतपुरे यांच्या शेतातुन जाणारे कॅनालमध्ये दि . ११/०२ /२०२१ रोजी पुरुष जातीचे अनोळखी प्रेत कोणीतरी अज्ञात आरोपींनी त्याचे दोन्ही पाय व कमरेला सुताचे काळे दोरीने बांधुन अज्ञात कारणा वरून निरा भाटघर कॅनालचे वाहते पाण्यात टाकून दिल्याने ते मिळुन आले होते. याबाबत पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सोलापुर ग्रामीण पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते ,सोलापुर ग्रामीण अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पंढरपुर विभाग पंढरपूर यांचे आदेशाने तालुका ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी सदर गुन्हयातील अज्ञात मयताचा व त्यांचे नातेवाईकांचा तसेच आरोपींचा शोध घेणेकामी दोन पथके तयार करून त्यांना तपासाबाबत मार्गदर्शन करून आदेश दिल्याने पथकाने पुणे ग्रामीण व सातारा जिल्हा तील निरा भाटघर कॅनालचे लगतचे पोलीस ठाणेस दाखल असलेल्या मानव मिसींगची माहीती घेत असताना माळशिरस पोलीस ठाणे मानव मिसींग नं .० ९ / २०२१ दाखल दिनांक ०२/०३/२०२१ प्रमाणे मिसींग व्यक्तीचे वर्णन व पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणेस वरील प्रमाणे दाखल गुन्हयातील मयताचे वर्णन मिळते जुळते वाटत असल्याने सदर मिसींगमधील खबर देणार संजय सिदाम चंदनशिवे रा.कमलापुर ता.सांगोला यांचेकडे विचारपूस केली असता त्यांनी यातील मयताचे अंगावरील कपडे जीन पॅन्ट , लक्स कोझी , कमरेचा बेल्ट , हाताचे मनगटातील कारले नक्षी काळा गोफ ओळखुन सदरचे प्रेत हे त्यांचे मेहुणे सुरेश गणपत कांबळे वय ४५ वर्षे रा.पिंपळे गुरव ता.हवेली जि.पुणे याचे असल्याचे खात्रीपुर्वक सांगितल्याने प्रथम यातील अनोळखी मयताची ओळख पटवून संशयीत व्यक्तींची माहीती काढून त्यांचे मोबाईल नंबर प्राप्त करून घेवुन सायबर पोलीस ठाणेचे मदतीने गुन्हयाचे विश्लेषण करण्यात आले .

गुन्हयातील मयत नामे सुरेश गणपत कांबळे रा. पिंपळे गुरव ता.हवेली जि.पुणे हा गारवडपाटी येथील हॉटेल अहिल्यामध्ये कुक (वस्ताद) म्हणून गेली १० ते १५ वर्षापासून काम करीत होता. परंतु अलीकडे त्यास दारूचे व्यसन लागल्याने तो नेहमी दारू पिवुन हॉटेल मालक व त्यांचे घरातील लोकांना शिवीगाळी करीत असल्याने त्याचा कायमचा काटा काढणेचे हेतुने आरोपी भाऊ मामा हुलगे, मामा भानुदास हुलगे,हणमंत निवृत्ती गोरड सर्व रा.गोरडवाडी ता.माळशिरस जि.सोलापुर यांनी दिनांक ०४/०२/२०२१ रोजी हॉटेलमधील इतर कामगांराना उद्या कामाला येवु नका असे सांगून त्या रात्री कुक / वस्ताद यास हॉटेलचे वरचे मजल्यावरील खोलीत झोपलेला असताना त्याचा कशाने तरी गळा आवळून त्यास जिवे ठार मारून दुसरे दिवशी दि.०५/०२/२०२१ रोजी त्याचे प्रेत दिवसभर हॉटेलचे वरील खोलीत ठेवुन अंधाराची वाट पाहुन रात्री २०:०० ते २२:०० या दरम्यान सदरचे प्रेत त्यांचेकडील पांढरे रंगाची स्कार्पिओ जिप नंबर एम.एच.४५ एन १६२६ हीचे मधून बिरोबा देवस्थान मंदिरापासून इस्लामपुर रोडने निरा भाटघर कॅनाल पुलावरून पुढे कॅनाल पट्टीने जावुन ३ किलो मिटर अंतरावर असलेल्या मौजे इस्लामपुर ता.माळशिरस गाव शिवारातील १० मोरी येथे नेवुन कॅनालचे वाहते पाण्यात फेकून देवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता .

परंतु सदर आरोपीपर्यंत पोहचण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक टिमने कौशल्यपुर्ण तपासाचे नियोजन करून यातील वरील तिन्ही आरोपीतांना दि.२७/०५/ २०२१ रोजी अटक करून त्यांचे हातात बेडया ठोकल्या आहेत.त्यांना दि.२८/०५/२०२१ रोजी अतिरीक्त सत्र न्यायाधीश श्री बावीस्कर यांचे कोर्टात हजर करून त्यांची दि . ०१/०६/२०२१ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे . या गुन्हयाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम , पंढरपूर विभाग पंढरपूर हे करीत आहेत .

सदर गुन्हयाचे तपासकामी पथक कमांक १ मध्ये पोलीस उपनिरीक्षक शिवाजी आटपाडकर,सपोफौ विलास कांबळे ,पो.ना.सुभाष शेडगे,पो.ना.सुनिल मोरे ,पो.ना.मोहसीन सयद ,पो.कॉ. रशीद मुलाणी , पो.कॉ.रवींद्र बाबर,म.पो.कॉ. अपर्णा माळी,पो.कॉ. अनवर आत्तार ने.सायबर पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण व पथक क्रमांक २ मध्ये पोलीस उपनिरीक्षक सुखदेव गोदे , सपोफौ श्री दिवसे , पो.ना. जाधव , पो.कॉ.आसबे ,पो.कॉ.काळे यांनी मदत केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: