कुर्डुवाडीत कोविड केअर सेंटरला रुग्णांना योग प्रशिक्षण
कुर्डुवाडीत कोविड केअर सेंटरला रुग्णांना योग प्रशिक्षण Yoga training for patients at covid Care Center in Kurduwadi
कुर्डूवाडी / राहुल धोका – कुर्डूवाडी शहरातील श्रीराम मंगल कार्यालय , महिला वस्तीगृह या कोविड केअर सेंटर या ठिकाणी पतंजली योग शिक्षक रवींद्र भांबुरे,दशरथ भांबुरे यांनी कोरोना रुग्णांना योग शिक्षण दिले आहे.

सूक्ष्म व्यायाम,अनुलोम विलोम,कपालभाती, भस्त्रिका ,भ्रामरी योगासनाचे प्रशिक्षण कोरोना रुग्णांसाठी तीन दिवस घेतले जाणार आहे.यासाठी कुर्डूवाडी नगरपरिषदेकडून अधिकृत विनंती करण्यात आली होती अशी माहिती आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांनी दिली. त्याच प्रमाणे गेले दीड वर्ष नगरपरिषद कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत या काळात ६ कर्मचारी कोरोना संक्रमित झाले आहेत त्यांचे मनोबल वाढवण्या साठी डॉ.लकी दोशी, डॉ.जयंत करंदीकर आदिंचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
योग शिक्षक लक्ष्मण भोंग यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की,कोरोना संक्रमित व्यक्तींनी पहाटे उठल्यावर १ लीटर कोमट पाणी प्यावे , अर्धा ग्लास गरम पाण्यात तुळशीचे ४-५ पाने , काळी मिरी ४ दाणे,आले २ तुकडे, दालचिनी , हळद, मणुके १० ते १२,अश्वगंधा अदि एकत्र करुन उकळी देवून पाणी अर्धे झाल्यानंतर गाळून घ्यावे. नंतर एक चमचा मध टाकून नियमित घ्यावे त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती निर्माण होईल.