फलटण शहरातील नागरिकांची घरपट्टी माफ करण्यात यावी – अनुप शहा

फलटण शहरातील नागरिकांची घरपट्टी माफ करण्यात यावी – अनुप शहा Anup Shah: Citizens of Phaltan should be exempted from house rent
फलटण - फलटण,जि.सातारा येथील नागरिक महामारीमुळे अडचणीत असल्याने त्यांना घरपट्टी माफ करा व व्यापारी लाँकडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे त्यांचे गाळेभाडे माफ करा अशा मागणीचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

   यावेळी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर ,गटनेते अशोक जाधव, नगरसेवक अनुप शहा, नगरसेवक सचिन अहिवळे, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष वसीम मनेर, माजी नगरसेवक जाकिर भाई मनेर आदी उपस्थित होते.

      या निवेदनामध्ये गेले दीड वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे नागरिकांना हाताला काम नाही, व्यापार्यांचे व्यवसाय बंद आहेत.यामुळे सर्वसामान्य जनता आर्थिक अडचणीत असल्याने या वर्षीचे घरपट्टी माफ करण्यात यावी तसेच नगरपरिषदेचे भाडेकरू असलेल्या व्यापाऱ्यांचे गाळा भाडे माफ करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे .

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: