माजी मुख्यमंत्री मायावती यांच्यावर हीन टीका करणाऱ्या रणदीप हुडा वर ऍट्रोसीटी अँक्टनुसार कारवाई करा – ना. रामदास आठवले

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्यावर हीन टीका करणाऱ्या रणदीप हुडा वर ऍट्रोसीटी अँक्टनुसार कारवाई करा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले Take action against Randeep Hooda under Atrocities Act for criticizing former Uttar Pradesh Chief Minister Mayawati – Union Minister of State Ramdas Athawale

मुंबई दि. 29 – बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख आणि उत्तर प्रदेश च्या माजी मुख्यमंत्री बहन मायावती यांच्यावर अत्यंत हीन अश्लील टीका केल्या बद्दल अभिनेते रणदीप हुडा यांचा तीव्र निषेध रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केला असून या प्रकरणी रणदीप हुडा वर अँट्रोसीटी अँक्ट नुसार कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

दलित बहुजन समाजाच्या नेत्या बहन मायावती यांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही. रणदीप हुडा सारखे अभिनेते फिल्म इंडस्ट्रीवर कलंक आहेत. जातीवाद आणि त्यातून समस्त महिला वर्गाचा अवमान करणारे वक्तव्य करून रणदीप हुडा याची मानसिकता हीन आणि जातीय द्वेषाची असल्याचे दिसत आहे. रणदीप हुडा यांच्यावर फिल्म इंडस्ट्रीने बंदी घातली पाहिजे.त्याच्यावर त्वरित अँट्रोसीटी अँक्टनुसार कारवाई करून रणदीप हुडा ला तुरुंगात डांबले पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: