लॉकडॉऊनमुळे पर्याय नाही
लॉकडॉऊनमुळे पर्याय नाही
जो तो कोरोनामुळे
मृत्यूच्या भीतीने ग्रासला आहे
लॉकडॉऊनमुळे पर्याय नाही
हतबल झालेला दिसतो आहे !!१!!
लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण
घरातच कैद झाला आहे
पुरवठा व मागणी अंतर अधिक
वेळापत्रक विस्कळीत झालेले आहे !!२!!
अजूनही राजकारणी गंभीर
झालेले दिसत नाहीत
सत्तेत असूनही एकमेकांचेवर आरोप प्रत्यारोप करण्याची संधी सोडत नाहीत !!३!!
स्मशानभूमीत अग्नीच्या ज्वाला
अजूनही थांबलेल्या नाहीत
एकाच वेळी तीस तीस अंत्यसंस्कार
पाहवत नाहीत !!४!!
आता अंत्यसंस्कारही सरकारी
अन्य मार्ग उरलाच नाही
विधी कर्मकांड सर्व स्थगित
आता ईलाज चालत नाही !!५!!
सुप्रभात
कालानुरूप बदलणे अपरिहार्य असले तरी सत्य , तत्व ,सूत्र अन नीती बदलणं योग्य नाही !!
आनंद कोठडीया,जेऊर ता.करमाळा
९४०४६९२२००
