टेंभूर्णी,अकलूज भागात वाटसरूंना लुटणारे आरोपी जेरबंद

टेंभूर्णी,अकलूज भागात वाटसरूंना लुटणारे आरोपी जेरबंद Accused of robbing Watsars in Tembhurni, Akluj area arrested
 टेंभूर्णी - दि.२८/०५/२०२१ टेंभूर्णी व अकलूज भागात रस्त्याने जाणारे वाटसरूंना लुटणारे आरोपी जेरबंद  करण्यात आले.दि.११/११/२०२० रोजी सायं ०८/०० वा.च्या सुमारास फिर्यादी जावेद खुतबुद्दीन नदाफ ,वय २१ वर्षे ,रा.माळेवाडी, ता.माळशिरस हे मित्रासह टेंभूर्णीहून अकलूजकडे ओमनी गाडीतून जात असताना वाफेगाव फाट्या जवळ आले असता पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोन इसमांनी गाडीला कट मारल्याचा जाब विचारण्याचा बहाणा करून ओमिनी थांबवून फिर्यादी व त्यांचे मित्राचे डोळ्यात चटणी टाकून त्यांचेकडील रोख रक्कम १,२५,३५० / - रूपये जबरीने चोरून नेलेबाबत अकलूज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. 

त्याचप्रमाणे दि २८/१२/२०२० रोजी सायंकाळी ०८/२० च्या सुमारास टेंभूर्णी पोलीस स्टेशन हद्दीत फिर्यादी ज्ञानेश्वर अनंत वास्ते ,वय ४३ वर्षे ,रा . मोडनींब ,ता.माढा व त्यांचे पिकअप वरील चालकासह अकलूज येथून कपडे विक्री करून त्यापासून आलेली रक्कम घेवून पिक अपमधून टेंभूर्णी मार्गे मोडनिंबकडे जात होते.ते टेंभुर्णी जवळील वृद्धाश्रमजवळ आले असता पिकअपचे पाठीमागून येणारे हिरो होंडा पॅशन प्रो मोटर सायकलवरून तीन इमसांनी येवून गाडीला कट का मारला असा बहाणा करून फिर्यादीस शिवीगाळी करून चाकूचा धाक दाखवून त्यांना पिकमधून रांझणी गावाकडे घेवून जावून त्यांचे कडील ४४,८६० / – रुपये जबरदस्तीने चोरून घेऊन गेलेबाबत टेंभूर्णी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता.

  सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी सदरचे दोन्ही गुन्हे हे टेंभूर्णी ते अकलूज रोडवर घडले होते तसेच आरोपींची गुन्हा करण्याची पध्दती पाहता रस्त्याने जाणारे वाहनांना गाडीला कट का मारला अशी विचारणा करत वाहन थांबवून मारहाण करून चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाची असल्याने स्थानिक गुन्हे शाखा , सोलापूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना सदर मार्गावर गुन्हे करणारे आरोपींचा छडा लावणेबाबत आदेश दिले होते . त्याप्रमाणे पो.नि.सर्जेराव पाटील यांनी सदर मार्गा वर गुन्हे करणारे आरोपींचा शोध घेण्यासाठी खास पथक नियुक्त केले होते .त्यावरून सदरचा गुन्हा करणारे आरोपींची गोपनिय माहिती काढून त्यातील दोन आरोपींना अटक करण्यात यश आलेले असून त्यांचेकडे तपास करता आरोपींनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.सदर आरोपींना सद्या टेंभूर्णी पोलीस स्टेशनच्या गुन्हयात तपासकामी वर्ग करण्यात आले आहे . 

    सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते,सोलापूर ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा , सोलापूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे,सहा.फौ.संदीप काशीद,पो.ह.बिराजी पारेकर ,पो.ह.श्रीकांत गाकयवाड,पो.ह.सलीम बागवान ,पो.ना.बापू शिंदे ,पो.ना.लाला राठोड सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी पार पाडली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: