वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेळवे परिसरात फळबागांचे नुकसान

वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेळवे परिसरात फळबागांचे मोठं नुकसान Heavy rains along with strong winds caused severe damage to orchards in Shelve area

शेळवे (संभाजी वाघुले) – काल झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे पंढरपूर तालुक्या तील शेळवे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या फळबागांचे खूप मोठं नुकसान झालं आहे.

 सुमारे 40 ते 50 एकर केळी बाग,40 ते 50 एकर डाळिंब बाग,10 एकरपर्यंत द्राक्ष बागेचे नुकसान झालं असून, शेडवरील बेदाण्यांचेही खूप मोठं नुकसान झालं आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे  तसेच मागील पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे आधिच हतबल झालेल्या शेतकऱ्यांवर या अस्मानी संकटाचा खूप मोठा परिणाम झाला आहे. हाता तोंडाशी आलेली नगदी पिकं अशी उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक कणा मोडला आहे. शासन प्रशासन स्तरावर याची तात्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त बागांचे त्वरित पंचनामे करावेत आणि हतबल झालेल्या बळीराजाला आधार देण्याचं काम सरकारने तातडीने करावे ही सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: