पंढरपूरात आजपासून 55 वर्षे वयापुढील नागरिकांची लसीकरण नोंदणी मोहीम

पंढरपूरात आजपासून 55 वर्षे वयापुढील नागरिकांची लसीकरण नोंदणी मोहीम Vaccination registration campaign for citizens above 55 years of age in Pandharpur from today

पंढरपूर – पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांना पंढरपूर नगरपरिषदचेवतीने आवाहन करण्यात येते की, आज सोमवार दि 31 मे 2021 पासून सकाळी 8।30 ते 11।30 या वेळेत पंढरपुर शहरातील वय वर्षे 55 पेक्षा जास्त असणाऱ्या ज्या नागरिकांनी प्रथम डोस घेतलेलाच नाही फक्त अशाच नागरिकांसाठी कोविड 19 लसीकरण नांव नोंदणी खालील ठिकाणी करण्यात येणार आहे (1)कवठेकर प्रशाला, नाथ चौक, पंढरपुर (2) आदर्श प्राथमिक विद्यालय, वेदांत भक्त निवास समोर, पंढरपुर (3) द.ह.कवठेकर प्रशाला, तालुका पोलीस स्टेशन मागे, पंढरपुर (4) कर्मयोगी विद्या निकेतन, लिंक रोड, पंढरपूर

        तरी या चार लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरणासाठी आपले नांवाची नोंद करावी. नांव नोंदणी करण्यास जाताना आपले स्वतःचे आधार कार्ड, मोबाईल नंबर घेऊन जावे असे आवाहन नगरपरिषदचेवतीने करण्यात आले आहे.

   नोंदणी केलेल्या नागरिकाचा ज्या दिवशी  लसीकरणाचा नंबर येईल त्याच्या एक दिवस अगोदर नागरिकांच्या मोबाईल नंबरवर पंढरपूर नगरपरिषेदेमार्फत sms केला जाईल. त्या sms मध्ये नागरिकाचे नांव, कोविड 19 लसीकरणाचा दिनांक व वेळ नमूद असेल.त्यानुसार नागरिकांनी लस घेणेसाठी अरिहंत पब्लिक स्कूल, मनीषा नगर, पंढरपूर या ठिकाणी हजर राहावे मात्र

लस घेण्यासाठी जाताना आपले टोकन आणि आधारकार्ड सोबत घेऊन जावे असे आवाहन पंढरपूर नगरपरिषदचेवतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: