मराठा महासंघाच्या वतीने गरजूंना धान्य व किराणा मालाचे वाटप

मराठा महासंघाच्यावतीने गरजूंना धान्य व किराणा मालाचे वाटप Distribution of food grains and groceries to needy on behalf of Maratha mahasangh

पंढरपूर /विजय काळे – अखिल भारतीय मराठा महासंघ व अर्जुनराव चव्हाण मित्र मंडळ पंढरपूर शहर व तालुका यांच्यावतीने कोरोना महामारीच्या संकटकाळात गोरगरीब, गरजूंना धान्य व किराणा मालाचे जवळ-जवळ १५० कुटुंबांना किटचे वाटप करण्यात आले. आपणही समाजाचे देणे लागतो हे भान ठेऊन,सामाजिक बांधिलकी जपत,फुल नाही एक फुलाचीपाकळी या उद्देशाने एक मदतीचा हात,सहकार्य म्हणून हे वाटप करण्यात आले.

 यावेळी बोलताना पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे म्हणाले की, मराठा महासंघाच्यावतीने जो हा उपक्रम राबविला आहे तो अतिशय स्तुत्य आहे,या संकट काळात गोरगरीब व गरजूंना तुम्ही मदतीचा हात दिला आहे,या उपक्रमाचा इतरही आदर्श घेतील.पुढील काळात संघटनेच्या माध्यमातून असेच समाज उपयोगी उपक्रम इतरांनी राबबावेत असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले.

   जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की ,आम्ही मराठा महा संघाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सामाजिक उपक्रम राबवत आहे.कोरोनाच्या काळातही गेले वर्ष झाले वाटप करत आलो आहोत आणि यापुढेही शक्य होईल तेवढे सहकार्य करण्याचा प्रयत्न करणार आहे .

याप्रसंगी पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान आवताडे,युवा नेते प्रणव परिचारक, प्रांताधिकारी सचिन ढोले ,जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख,जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे, तालुका कार्याध्यक्ष शिवाजी मोरे,पंढरपूर शहराध्यक्ष अमोल पवार,शहर उपाध्यक्ष शामराव साळुंखे,शहर संघटक काका यादव,विक्रम बिस्किटे सर,संतपेठ विभाग प्रमुख पांडुरंग शिंदे,रिक्षा संघटना अध्यक्ष नागेश गायकवाड,शहर उपाध्यक्ष यशवंत बागल,शहर सचिव प्रमोद कोडग, माल वाहतूक संघटना अध्यक्ष राहुल यादव,उपाध्यक्ष सोमनाथ झेंड,समाधान घायाळ,भास्कर घायाळ, सोपानकाका देशमुख,महेश माने,लक्ष्मण जाधव, सचिन थिटे,सचिन नडे,मनिष कुलकर्णी,मोहित साळुंखे,प्रमोद परदेशी,रोहित चव्हाण,वैभव चव्हाण यांच्यासह मराठा महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: