गोफणगुंडा – माझ्या अनुभवातील अमृततुल्य सूत्रे ….
गोफणगुंडा – माझ्या अनुभवातील अमृततुल्य सूत्रे
श्रम सोनं आहे। स्वावलंबन अमृत आहे!
परोपकार भूषण आहे!
अहंकार मुक्ती कळस आहे!
क्रोध वैर द्वेष राग विकृति आहे
सर्वांना प्रेमाने जोडणं अन
अर्थपूर्ण बोलणं हीच गुरुकिल्ली आहे !!
उंबरठ्यावर कोरोना ...

उंबरठ्यावर माझ्या कोरोना मी घरात काळजीत आहे
सारा देश नवा नवा अनुभव घेत सोसतो आहे !!१!!
अफवांचे पीक जोमात सर्वत्र आकडेवारीचा खेळ आहे
सारेच जबाबदार मात्र बघ्याच्या भूमिकेत अधिक आहेत !!२!!
जाईल तिथे आजारापेक्षा संशयाचा धूर आहे
लॉक डाउन आहे पण लोकसहभाग कठीण आहे!!३!!
जमीन आहे पण सारी आकारीपड आहे
करायचं कोणी सरकारवर विसंबून आहे !!४!!
"सुप्रभात"
चांगलं पाहणं, समजावून घेणं,आत्मसात करणं अन ते आचरणात कायम करण यास निर्णायक मन लागते.
आनंद कोठडीया,जेऊर ता.करमाळा
९४०४६९२२००
