पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील 7 वर्षे दलित मागास वर्गीयांच्या हिताची – ना.रामदास आठवले

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार ची 7 वर्षे दलित मागासवर्गीयांच्या हिताची – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 7 years of Prime Minister Narendra Modi-led Union Government in the interest of Dalit Backward Classes – Union Minister of State Ramdas Athawale
  मुंबई दि.30 -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप एनडीएच्या केंद्र सरकारला 7 वर्षे पूर्ण होत असून या 7 वर्षांमध्ये दलित आदिवासी बहुजन मागासवर्गीय समाजाच्या हिताची काळजी घेऊन त्यांना अधिक बळ देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मोदी सरकारची 7 वर्षे दलित मागासवर्गीयांच्या हित साधणारी असल्याचे सांगत मोदी सरकारला 7 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

    जनतेने मोदी सरकारला 7 वर्षे साथ दिली अशीच साथ पुढेही देत राहावे,पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांना साथ देत सर्वांना सोबत घेऊन देशाचा विकास करतील, विश्वात भारताचे नाव महासत्ता म्हणून यशस्वी करतील असा विश्वास ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला. 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलितांना संरक्षण देण्यासाठी अँट्रोसिटी अँक्ट अधिक मजबूत करण्यासाठी संसदेत कायदा केला.दलित आदिवासी ओबीसी व्यतिरिक्त सवर्ण समाजातील गरिबांना आर्थिक निकषावर 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, जम्मू काश्मीर प्रकरणी 370 कलम हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन भारताशी जम्मू काश्मीरचे नाते घट्ट करीत एकसंघ केले.ट्रान्सजेडर,दिव्यांग सर्व दुर्बल घटकांना न्याय दिला. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वप्रथम लॉकडाऊन लावून लाखो लोकांचे प्राण वाचविले. यंदा मात्र कोरोनाच्या केसेस अचानक खूप वाढल्या . त्यातही केंद्र सरकारने जनतेची सेवा चांगली केली. लोकांचे प्राण वाचविण्यासाठी खूप प्रयत्न झाले.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून देश सावरत आहे. मोदींनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांना सर्वांनी साथ दिल्यास आणखी प्रगती च्या दिशेने ते देशाला घेऊन जाऊ शकतात. नरेंद्र मोदी हे द्रष्टे नेते आहेत असे गौरवोद्गार ना रामदास आठवले यांनी व्यक्त काढले. त्यांच्या नेतृत्वाखाली मागील 5 वर्षे मी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले.       

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: