अनवली येथे अवैध दारु धंद्यावर पंढरपूर तालुका पोलीसांची कारवाई

अनवली येथे अवैध दारु धंद्यावर पंढरपूर तालुका पोलीसांची कारवाई Pandharpur taluka police action on illegal liquor trade at Anwali

पंढरपूर, 31/05/2021- अनवली येथील अवैध दारु धंद्यावर पंढरपूर तालुका पोलीसांनी कारवाई केली. सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर ग्रामीण घटकातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पंढरपूर उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किरण अवचर पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाणेचे स्तरावर वेळोवेळी अवैध धंद्यावर कारवाई करण्यात येत आहे .त्या अनुषंगाने काल दि . ३०.०५.२०२१ रोजी सायंकाळी पंढरपूर तालुक्या तील अनवली येथील अष्टभुजा हॉटेलचे बाजुलगत घरामध्ये अवैधरित्या दारु विक्रीबाबत गोपनीय बातमी प्राप्त झाल्याने त्याबाबत पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी तात्काळ सदर बातमीची खात्री करण्याकामी पथक रवाना केले.या ठिकाणी जावून पथकाने अष्टभुजा हॉटेल बारचे शेजारील घरामध्ये जावून पाहणी केली असता त्याठिकाणी अवैधरित्या दारु विक्री होत असल्याचे मिळून आले.

 या कारवाईमध्ये एकूण रु.३४,६२०/-किंमतीचा अवैध दारुचा साठा पोलीसांनी जप्त केला आहे . त्यामध्ये मॅकडॉल व्हिस्की,ब्लॅक डीएसपी व्हिस्की ,मॅजिक मोमेंट,गोवा जिन,डॉक्टर ब्रँण्डी , इंम्पेरियल ब्ल्यु या प्रकारच्या अवैध दारुचा साठा जप्त केला आहे .सदरचा अवैध दारुचा साठा सुरेश गुंडिबा शिंदे रा.अनवली ता.पंढरपूर व सचिन गोपाळ देशमुख रा.हातकणंगले जि.कोल्हापूर सध्या रा.अनवली ता.पंढरपूर यांनी आपले जवळ अवैधरित्या बाळगल्याने दोन्ही आरोपींविरुध्द पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे पो.कॉ.अनिल वाघमारे यांनी सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दिली आहे . 

  सदरची कारवाई ही सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते,अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पंढरपूर उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किरण अवचर पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली स.पो.नि.आदिनाथ खरात,स.पो.नि. शंकर ओलेकर,पो.हे.कॉ.पांडुरंग ढवळे,पोलीस नाईक श्रीराम ताटे ,पो.कॉ.अनिल वाघमारे यांनी केली असून गुन्हयाचा पुढील तपास पो.हे.कॉ. पांडुरंग ढवळे हे करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: