कुर्डुवाडीत डॉक्टरांची हत्या झाल्याची अफवा

कुर्डुवाडी पोलिसांनी महिती देण्याचे केले आवाहन खंडणीसाठी वैद्यकीय क्षेत्रास त्रास दिला जात असल्याची शक्यता ? Rumors of doctor’s murder in Kurduwadi

कुर्डूवाडी/ राहुल धोका – कुर्डूवाडी शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टरांबद्दल शहरात विविध अफवांचे पिक पसरवले जात आहे. कोरोनाच्या कठिण काळात रुग्णांसाठी अहोरात्र झटणारे येथील वैैैद्यकीय क्षेत्रातील प्रतिथयश डॉक्टरांची हत्या झाल्याची अफवा पसरली होती तसेेच ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टरांचे हातपाय तोडले आहेत हे खरं आहे का ? असे विचारणा करणारे फोन आमच्या प्रतिनिधींंकडे येत होते.

कोरोनासारख्या महामारीत दिवस रात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टरांबद्दल अशा अफवा पसरवणाऱ्या व्यक्ती शोधून पोलिसांनी करवाई करावी.यासाठी सर्व डॉक्टरांनी एकजूटीने या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध करावा असे जेष्ठ मार्गदर्शक डॉ.विलास मेहता यांनी प्रतिनिधीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांसाठी काम करणाऱ्या डॉक्टरांविषयी जाणीवपूर्वक  अफवा पसरवल्या जात असून भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. कुर्डूवाडी पोलिसांकडे या विषयी विचारणा केली असता त्यांच्याकडे या विषयी अजून कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही असे सांगितले गेले.अशा अफवा पसरवण्या मागे खंडणीचा प्रकार असावा अशी नागरिकांत चर्चा सुरू आहे.
 साह्यक पोलिस निरिक्षक केंद्रे यांनी सर्व नागरिकांना विनंती केली आहे की डॉक्टरांच्या संदर्भात जो कोणी विनाकारण सोशल मीडिया माध्यमातून किंवा अन्य मार्गाने बदनामीकारक अफवा पसरवत असतील हे पोलिसांचे निदर्शनास आल्यास त्वरित कडक कारवाई करण्यात येईल . कुर्डूवाडी शहरातील डॉक्टर्स या कोरोना महामारी च्या काळात खरोखरच देवदूत म्हणून काम करीत आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या संदर्भात बदनामी कारक मजकूर किंवा अफवा पसरवणार्यांना सायबर क्राईम ब्रँचकडून सहाय्य घेवून कडक कारवाई करण्यात येईल. काही आक्षेपार्ह कमेंट आढळल्यास तातडीने पोलिसांचे निदर्शनास आणुन द्यावे असे आवाहन सहा.पोलीस निरीक्षक सी.व्ही.केंद्रे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: