गोफणगुंडा टोलनाका
टोलनाका:
माणूस
देव दिसत नाही ,तरी भक्ति करतो
भूत दिसत नाही ,तरी घाबरतो
विश्वासाने दगड पूजतो
अख्ख आयुष्य भय भीती
अन अंधश्रद्धा जोपासतो
कारणांचा शोध घेत नाही
स्वप्नांचे बळी पडतो
कारण नसतांना दगड होतो
अन माणूस असूनही पशूला लाजवतो “!!
अमृततुल्य सूत्रे ....
श्रम सोनं आहे।
स्वावलंबन अमृत आहे!
परोपकार भूषण आहे!
अहंकार मुक्ती कळस आहे!
क्रोध वैर द्वेष राग विकृति आहे
सर्वांना प्रेमाने जोडणं अन
अर्थपूर्ण बोलणं हीच गुरुकिल्ली आहे “!!
"सुप्रभात"
चांगलं पाहणं, समजावून घेणं,आत्मसात करणं अन ते आचरणात कायम करण यास निर्णायक मन लागते.
आनंद कोठडीया,जेऊर ता. करमाळा-
९४०४६९२२००
