तंबाखूमुक्त समाज निर्माण होणे ही काळाची गरज – जिल्हाधिकारी राजीव निवतकर

सर्वांनीच तंबाखुला नाही म्हणा ही काळाची गरज – जिल्हाधिकारी राजीव निवतकर Not everyone says no to tobacco, this is the need of the hour – Collector Rajiv Nivatkar

मुंबई, दि.31- तंबाखूमुक्त समाज निर्माण होणे ही काळाची गरज असून सर्वांनीच तंबाखुला नाही म्हणा,असे प्रतिपादन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी आज येथे केले.

नशामुक्त भारत अभियान मुंबई शहर जिल्हा, सामाजिक न्याय विभाग, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व सलाम मुंबई फाऊंडेशन तसेच राष्ट्रीय सेवा योजना मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ मे २०२१ या जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त मुंबई येथे ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

   श्री.निवतकर म्हणाले,मुंबई शहरातील शाळा, महाविद्यालये यांचा परिसर तंबाखूमुक्त राहील यासाठी सातत्याने जनजागृती करुन विशेष कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. व्यसनाकडे घरातूनच लक्ष देणे आवश्यक असून त्यासाठी मुलांच्या पालकांनी विशेष लक्ष द्यावे.

  तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन,तंबाखू नियंत्रण कायदा, तंबाखू मुक्त शाळा,कोविड-19 आणि तंबाखूचे सेवन संबधी व शासनाच्या तंबाखू नियंत्रणाबाबत योजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच कोरोना आणि तंबाखूचे सेवन यांचा परस्पर संबध काय आहे, तंबाखू नियंत्रण कायदा व तंबाखू मुक्त शाळा या बद्दलचीही माहिती वेबीनारमध्ये देण्यात आली.

सहा.संचालक आरोग्य सेवा,महाराष्ट्र डॉ.दुर्योधन चव्हाण, यांनी तंबाखू नियंत्रण कार्यक्रम NTCP, तंबाखू आणि असंसर्गजन्य आजार याबाबत माहिती दिली आणि या अभियानात लोक सहभागाचे आवाहन केले .

डिमांड आहे म्हणून सप्लाय आहे त्यामुळे तंबाखूला नाही म्हणा – श्रीमती वर्षा विद्या
  डिमांड आहे म्हणून सप्लाय आहे त्यामुळे तंबाखूला नाही म्हणा,शाळा, कॉलेज,विद्यार्थी पालक,शासन प्रशासन समाजाचा सहभाग कसा वाढवावा तसेच व्यसनी व्यक्ती ने काय उपाय करावे याबाबत नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस श्रीमती वर्षा विद्या विलास यांनी सांगितले.

   वेबिनार समारोप मार्गदर्शन समाधान इंगळे, सहायक आयुक्त समाजकल्याण, मुंबई शहर यांनी केले. या वेबिनारचे सूत्रसंचलन अमोल मडामे, चिटणीस नशाबंदी मंडळ आणि डॉ.अभिराम यांनी केले. प्रारंभी जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी तंबाखू मुक्त भारत-महाराष्ट्र ची शपथ दिली.

वेबिनारची सुरुवात गायक शान याच्या लाईफ से पंगा मत ले यार या गाण्याने व समारोप नशाबंदी मंडळाच्या संगे जोडूनीया हाथ व्यसन नका करू तुम्ही होईल हो घात या गाण्याने झाली या वेबिनारसाठी मुंबई शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, शिक्षक व स्वयंसेवी संस्थाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: