मानसिक आधार देत ताणतणाव कमी करणे गरजेचे – नुतन लायन्स अध्यक्ष विवेक परदेशी
मानसिक आधार देत ताणतणाव कमी करणे गरजेचे – नुतन लायन्स अध्यक्ष विवेक परदेशी Need to reduce stress by providing mental support – New Lions President Vivek Pardeshi
लायन्स क्लब पंढरपूरमार्फत कोव्हीड सेंटरमध्ये गायक रफीक शेख यांचा सुगम संगीत कार्यक्रम संपन्न

पंढरपूर- लायन्स क्लब पंढरपूर,नगरसेवक विवेक परदेशी मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ६५ एकर भक्तिसागर कोव्हीड सेंटरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी, त्यांच्या मनातील ताण तणाव दूर व्हावा या उद्देशाने मनोरंजनासाठी सुगम संगीत कार्यक्रमाचे २९ व ३० में रोजी दोन दिवस आयोजन करण्यात आले होते. पंढरपूरातील प्रसिद्ध गायक रफीक शेख यांच्या सरगम काराओके टिम यांच्या माध्यमातून सदर कार्यक्रम पार पडला.
दर कार्यक्रमाचा सर्व नागरिकांनी आनंद घेतला असुन बरेच कोरोना बाधीत नागरिकांनी नृत्याचा आनंद घेतला.आजचा दिवस आमच्या आयुष्या तील खुप चांगला व यादगार दिवस असल्याचे प्रतिक्रिया व्यक्त केली. या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये आपण एकाच कुटुंबातील असल्याची भावना निर्माण झाल्याचे कबुल केले व आयोजकाचे आभार मानले.

कोव्हीड सेंटरमध्ये औषधे,व्हिटॅमिन सी युक्त फळे, सुका आहार वाटप कार्यक्रम संपन्न
नागरिकांमधील नेमकी गरज शोधून ती पुर्ण करण्याचे काम लायन्स संस्था करत आली आहे. विशेषतः या दुसऱ्या लाटेमध्ये नागरिकांच्या मना मध्ये कोरोनाविषयी खूप भिती आहे. अशा वेळी आपण आपल्या मित्र परिवारांना मानसिक आधार देणे खुप गरजेचे असल्याचे नुतन लायन्स अध्यक्ष विवेक परदेशी यांनी सांगितले. या दुसऱ्या लाटे मधील सदर गरज ओळखून नागरिकांच्या मना तील भिती दुर व्हावी यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. परदेशी यांनी दोन दिवस पुर्ण वेळ उपस्थित राहून कलाकरांना साथ देऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला. उपस्थित नागरिकांचे मनोबल वाढवण्यासाठी एक मोटीव्हेशनल गाणे ही गायले. सदर उपक्रमासाठी संस्थेचा संग्रहीत केलेला निधी न वापरता अध्यक्ष परदेशी यांनी स्वतः सुगम संगीत कार्यक्रम, अर्सेनीक अल्बम २०० होमिओपॅथिक औषध, सुका आहार व व्हिटॅमिन युक्त फळांचे वाटप सर्व कोरोनाबाधीत नागरिकांना केले व एस.पी.पंढरी न्युजच्या सहकार्यांने युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सर्व लायन्स सदस्य,पदाधिकारी, समाजसेवक, पंढरपूर व इतर गावातील हजारो नागरिकांनी सदर कार्यक्रमाचा आनंद घेतला.
याप्रसंगी युवा नेते प्रणव परिचारक,प्रांत अधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर,डॉ जानकर, डॉ अमीत गुंडेवार,युवा नेते रोहन प्रशांत परिचारक, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, यश नागेश भोसले, नगरसेवक जगदीश जोजारे,सिद्धिविनायक विरधे आदी उपस्थित होते.
मान्यवरांनी सदर कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल लायन्स संस्था, नगरसेवक परदेशी व सरगम शोच्या सर्व कलाकारांचे आभार मानले तसेच सर्व कोव्हीड पेशंटना धिर,दिलासा दिला. कोरोनामुक्त झाल्यावरही डॉक्टरांचे सुचनेप्रमाणे आपण योग्य आहार,विश्रांती,व्यायमावर भर द्यावा असे सांगत प्रशासन,लोकप्रतिनिधी,सामाजिक संस्था सदैव आपल्या सोबत असल्याचे सांगितले . यावेळी कोव्हीड सेंटरवर काम करणाऱ्या कर्मचारी, डॉक्टरांचा सत्कार करून रुग्णांप्रती समर्पित भावनेने केलेल्या सेवेचा सन्मान करुन आभार व्यक्त केले.