शेळवे गाव लवकरच होणार कोरोनामुक्त
ग्रामपंचायत व ग्रामस्तरिय समितीच्या योग्य नियोजनामुळे शेळवे गाव कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर Due to proper planning of Gram Panchayat and Village Level Committee, Shelve village is on the threshold of coronation
शेळवे,(संभाजी वाघुले) – शेळवे ता.पंढरपुर या गावाची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. मागील लाॅकडाऊन पेक्षाही यावेळीचा लाॅकडाऊन शेळवे नागरिकांनी कडक पाळलेला असल्यामुळे आता शेळवे गाव कोरोनामुक्त होत आलेले आहे.आता शेळवे गावात फक्त ४ पेशंट आहेत व ते सर्वजण पंढरपुरातील सीसीसी त आहेत व त्यांना ५ व ७ दिवस झालेले आहेत.या पेशंटचा डिचार्ज झाला म्हणजे शेळवे गाव कोरोनामुक्त होईल .
यावेळेच्या लाॅकडाऊनवेळी शेळवे ग्रामपंचायतीने शेळवे गावासह व संपुर्ण वाडीवस्तीवरही एक आठवडाभर कंमाडो ठेवल्यामुळे शेळवे गावची कोरोना साखळी लवकर तुटलेली आहे.यामुळे शेळवे ग्रामस्थांनी व शेळवे ग्रामपंचायतीने सुटकेचा श्वास सोडलेला आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर सोलापूर यांचे आदेशानुसार व प्रांताधिकारी सचिन ढोले पंढरपूर व तहसीलदार बेल्हेकर पंढरपूर यांचे मार्गदर्शना खाली तलाठी,ग्राम कोरोना समिती व ग्रामपंचायत शेळवे यांनी कोणताही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होम isolation मध्ये ठेवणे बंद केल्यानंतर कोरोना साखळी आटोक्यात येवून शेळवे गाव कोरोनामुक्त झाले आहे.यात सर्वांचे सहकार्य मिळाले.कोणत्याही शासकीय /ग्राम पद नसणारे व फक्त तलाठी नियुक्त सदस्य नामदेव गोरख गाजरे यांचे सलग दुसऱ्या वर्षी गावाला अनपेक्षित सहकार्य लाभले आहे.त्यांनी कोणत्याही प्रकारची जीवाची पर्वा न करता खूप मोलाची कामगिरी बजावून लोकांना आधार, धीर देण्याचे काम केले आहे… तसेच गावात चांगल्या प्रकारे एकोपा ठेवला आहे. -बी.पी .कौलगे तलाठी शेळवे .
शेळवे गावातील नागरिकांनी स्वतः व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेतली आहे.आशा वर्कर,शेळवे ग्रामपंचायत व शेळवे ग्रामस्तरिय समिती,सर्व शिक्षक स्टाफ ,शेळवे तलाठी व नामदेव गोरख गाजरे वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शानामुळेच गाव कमी वेळातच कोरोना मुक्त झालेले आहे.
शेळवे गावात महत्त्वाचे म्हणजे आरोग्य सेवक , आशा सेविका,अंगणवाडी सेविका,शिक्षक वर्ग यांनी घरोघरी जाऊन कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या लोकांचे रॅपिड टेस्ट करण्यासाठी प्रयत्न केले. बाधित व्यक्तींच्या घरी मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात जाऊन लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले.प्रसंगी लोकांची बोलणी खाल्ली.त्यामुळे या गावाच्या कोरोना मुक्तीच्या वाटचालीत त्यांचे मोलाचे व महत्त्वाचे काम आहे म्हणून शेळवे गाव त्या सर्वांचे मनापासून आभार मानते असे शेळवे गावचे तलाठी कौलगे यांनी म्हटले आहे.
शेळवे गाव कोरोना मुक्त होण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले त्यामध्ये सर्व आरोग्य सेवक, आशा वर्कर ,अंगणवाडी सेविका, ग्रामस्तरीय कोरोना कमिटीतील सर्व सदस्य,शिक्षक स्टाफ, तलाठी ,ग्रामसेवक,सरपंच ,उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थ शेळवे व सर्व ग्रामस्थांना वेळोवेळी आपल्या लेखणीतून मार्गदर्शन करणारे पत्रकार बांधव या सर्वांच्या अथक प्रयत्नाने आपले गाव कोरोना मुक्त होण्यास मदत झालेली आहे त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. – रमेश गाजरे , माजी उपसरपंच शेळवे.