आ.समाधान आवताडे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी करणार प्रयत्न

आ.समाधान आवताडे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी करणार प्रयत्न MLA Samadhan Awtade will try to solve the problems of farmers

पंढरपूर (प्रतिनिधी) – केंद्र तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कमीत-कमी व्याज दरात पिक व त्या पिकांच्या क्षेञाच्या आधारे ठरवून दिलेली रक्कम पिक कर्ज म्हणू कमीत कमी कागदपञांच्या आधारे अल्प मुदतीसाठी देण्याची शासनाची योजना आहे.परंतु सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात अनेक बँका या शेतकऱ्यांना विविध कागदपत्रांची मागणी करून नाहक त्रास देत असल्याचे शेतकरी नाराज झाले आहेत.

   जरी पीक कर्जाची अर्ज मागणी ऑनलाईन असली तरी ओरिजिनल कागदपञ व पुढील बाबीं साठी बँकेत जावे लागत आहे.शेतकरी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटात आणि अतिवृष्टीमुळे अधिक पिचलेला असल्याने तो आर्थिक संकटात सापडला आहे.त्यातच आता पावसाळा तोंडावर आला आहे किंबहूना तो सुरू झाला आहे तरीही अद्याप पिक कर्जाचे वाटप पंढरपूर तालुक्यातील अनेक बँकांकडून म्हणावे असे झाले नसल्याचे चित्र आहे .त्याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अधिक कागदपत्रांची मागणी करणे , वारंवार हेलपाटे मारण्यास भाग पाडणे असल्याने शेतकरी हतबल , अधिक निराश झाला आहे.

आपल्या पीक कर्जाच्या प्रश्नाबाबतच्या मागण्या प्रमुख शासकीय व बँक अधिकारी यांची एखादी बैठक घेऊन पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आ.समाधान आवताडे हे आपल्या पीक कर्जाचा प्रश्न मार्गी लावतील अशी अपेक्षा शेतकर्यांमधून होती परंतु तसे होताना दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.निदान आतातरी लवकरात लवकर आ.समाधान आवताडे यांनी पंढरपूर उपविभागीय अधिकारी,तहसिलदार व पीक कर्ज देण्यास पाञ असलेल्या बँकेंच्या  अधिकार्‍यांची बैठक घेऊन किंवा लेखी पञाव्दारे सुचना द्याव्यात अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

  शेतकऱ्यांच्या पीक कर्जबाबत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी आवाज न उठवल्याने शेतकरी बांधव हतबल झाले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: