तहसील कार्यालया समोर बळीराजा शेतकरी संघटना करणार बेमुदत धरणे आंदोलन

तहसील कार्यालयासमोर बळीराजा शेतकरी संघटना करणार बेमुदत धरणे आंदोलन Baliraja Shetkari Sanghatana will hold indefinite protest in front of tehsil office
   पंढरपूर /नागेश आदापूरे - पंढरपूर तहसील कार्यालय समोर विठ्ठल सहकारी साखर कारखाना, भीमा सहकारी साखर कारखाना,दामाजी सहकारी साखर कारखाना,मंगळवेढा या कारखान्यांचे ऊस बिल, कामगारांचे पगार,ऊस वाहतूकदारांची बिले  त्वरित द्यावीत यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन पंढरपूर तहसील कार्यालय दिनांक 16/06/2021 बुधवार पासून करण्यात येणार आहे .

 यावेळी बोलताना बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष ‌ज्ञानेश्वर जवळेकर म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ‌कारखानदारांनी शेतकर्‍यांना ‌आधार ‌देण्यासाठी त्यांचे हक्काचे ऊस बील व कर्मचाऱ्यांना पगार त्वरीत द्यावेत.एफ आरपी नुसार शेतकर्‍यांना ऊस कारखान्यात दिल्यापासून 14 दिवसात रक्कम अदा करण्यात आली पाहिजे मात्र अद्याप ही रक्कम जमा झालेली नाही तरी ही रक्कम 18 टक्के व्याजदरा सह द्यावी. 

     यावेळी निवेदन देताना बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल,जिल्हा अध्यक्ष माऊली जवळेकर, मोहोळ तालुकाध्यक्ष रमेश भोसले, मंगळवेढा तालुकाध्यक्ष दामाजी मोरे,सर्जराव‌ शेळके,किसान युवा क्रांतीचे जिल्हा अध्यक्ष प्रतापसिंह चंदनकर, रामेश्वर झांबरे, शेखर कोरके,रमेश लंगोटे, नितीन गावडे, मारुती कोळसे, सचिन जवळेकर,सुरज भांगे,अंकुश जवळेकर, प्रशांत मलशेट्टी,तानाजी सोनवले, औदुंबर ‌सुतार, अनंता लामकाने,अनिल शिंदे ‌आदींसह शेतकरी उपस्थित होते.

सहकार शिरोमणी साखर कारखाना, सिताराम साखर कारखान्याचे ही शेतकर्‍यांची बील आणि कर्मचार्यांचे पगार थकीत असल्याचे सांगितले जात आहे याबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: