मीडियाचे प्रतिनिधी आणि पोलिस अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्याचे निर्देश -ना.डॉ.नीलम गोऱ्हे

मीडियाचे प्रतिनिधी आणि पोलिस अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्याचे निर्देश -ना.डॉ.नीलम गोऱ्हे Media Representatives and Police Officers Instructed to Conduct Workshops – Dr. Neelam Gorhe
सातारा येथील अत्याचारीत मुलीच्या शासकीय रुग्णालयात चित्रीकरण करून प्रसिद्ध करणाऱ्या अधिकारी व संबंधितांवर कार्यवाही करून अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी पोलीस अधिकारी आणि मीडियाचे प्रतिनिधी यांची संवेदनशीलता वाढविण्यासाठी कार्यशाळा दिशानिर्देश देण्यात यावे – ना.डॉ.नीलम गोऱ्हे
     पुणे/सातारा दि ०२ जून, २०२१- सातारा जिल्ह्यातील लोणंद वाठार स्टेशन जवळ वास्को निजामुद्दीन एक्सप्रेस रेल्वेतून दि.०१ जून, २०२१ रोजी अल्पवयीन मुलीने अत्याचारास विरोध केल्यामुळे आरोपीने पीडित मुलीला चालत्या गाडीतून खाली फेकले. तिच्यावर सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

 या दरम्यान पोलीस दलातील अधिकारी आणि काही मीडियाचे प्रतिनिधी यांनी सदरील पीडित मुलीची विचारपूस केली. सदरील पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून यात मुलीची ओळख उघड करणे किंवा मुलीचे चित्रीरकरण करणे कायद्याने गुन्हा आहे. असे असताना देखील तपास अधिकारी आणि तेथे उपस्थित असलेल्या मीडियाने किंवा ज्या कोणी व्यक्तीने व्हिडीओ शुंटिंग केली आहे अशा व्यक्तींना समज देऊन कार्यवाही होणे आवश्यक आहे असे मला वाटते. काही वाहिन्यांनी तर सदरील घटना अथवा तपासाचा व्हिडीओ हा चेहरा अदृश्य पद्धतीने दाखवला पण काहीं वाहिन्यांवर मुलीचा चेहेरा स्पष्टपणे दिसेल असा दाखविला आहे, हा निष्काळजीपणा घडायला नको होता.या संदर्भात महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी हे निरीक्षण नोंदवत सातारा पोलीस अधीक्षक व रेल्वे पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवून कार्यवाही करण्याची सूचना केली आहे.

    यात सदरील घटनेची दखल अतिरिक्त रेल्वे पोलीस महासंचालक श्रीमती प्रज्ञा सरवदे यांनी सदरील घटनेची दखल घेऊन दिशानिर्देश दिले आहेत. तसेच याबाबत सातारा पोलीस अधीक्षक यांना ना.डॉ.गोऱ्हे दूरध्वनीवरून संपर्क करून सदरील प्रकरणात कार्यवाही करण्याची सूचना केली आहे.यात अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी त्वरित कार्यवाही आणि कायदेच्या संवेदनशीलता या संदर्भात कार्यशाळा घेण्याचे आश्वासन दिले आहे. 

यावेळी ना.डॉ.गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक श्री बन्सल व रेल्वे पोलीस अधीक्षक यांना १. पिडीत मुलीला समुपदेशन करून मनोधैर्य योजनेतून मदत मिळवून द्यावी .

२. कार्यक्षम विशेष सरकारी वकीलांकडे केस सोपविण्यात यावी .
३. रेल्वेतील महिला सुरक्षेबाबत सुचना पोलीस महासंचालक रेल्वे यांना दिल्या आहेत व त्यांच्या कडील कार्यवाहीची मी माहिती घेतली आहे .
४. घटनेचे अयोग्य वार्तांकन करण्यास जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी. तसेच अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी पोलीस अधिकारी आणि मीडियातील प्रतिनिधी यांची संवेदनशीलता वाढविण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्याची सूचना ना.डॉ.गोऱ्हे यांनी पोलीस विभागास लिहिले पत्रात केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: