थकीत ऊस बिले त्वरीत द्या अन्यथा तीव्र संघर्ष होईल – रणजित बागल

थकीत ऊस बिले त्वरीत द्या अन्यथा तीव्र संघर्ष होईल – रणजित बागल Pay tired sugarcane bills quickly otherwise there will be intense struggle – Ranjit Bagal
       पंढरपूर, 02/06/2021 - गेल्या गळीत हंगामातील ऊस उत्पादकांची राहिलेली रक्कम राज्यातील अनेक कारखानदारांनी अजुनही दिलेली नाही, मात्र सरकार यावर कोणतीही ठोस कारवाई करत नाही त्यामुळे कारखानदार निर्धास्त झाले आहेत. कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अन्यथा कारखानदारांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी दिला आहे.

    ऊसबीलाची थकीत रक्कम न अदा केल्याने कारखान्यांवर दोन वेळा जप्तीची (आरआरसी)ची कारवाई होऊनही शेतक-यांच्या पदरात काय पडले हा संशोधनाचा विषय आहे.ही कारवाई फक्त कागदावरच झाली आहे.सत्तेच्या दबावापोटी या साखर सम्राटांवर प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नाहीत,त्यामुळे दुसरा गळित हंगाम तोंडाशी आला तरी मागील वर्षीच्या उसाची बिले तोडणी वाहतूक व कामगारांच्या पगारी व शेतकऱ्यांना ऊसबिले मिळालेली नाहीत. राज्यात अनेक कारखानदारांकडून अजुनही मागील हंगामाचे बील देण्यात आलेले नाही ही रक्कम थोडीथोडकी नसुन संपुर्ण राज्यातील ऊसदराची थकीत रक्कम जवळपास 125 कोटीच्या आसपास आहे. अशा कारखान्यांवर सरकारने आरआरसीची कारवाई करण्याची घोषणा करून दोन महिने उलटले तरीही कारखानदारांना साधी एखादी नोटीस देखील प्रशासनाकडून पाठवण्यात आलेली नाही हे वास्तव आहे. वास्तविक पाहता ऊसदर नियंत्रण कायद्यानुसार ऊसदराची रक्कम ही चौदा दिवसाच्या आत देणे बंधनकारक असताना मात्र इतके दिवस सरकार गप्प का हा सवाल देखील यानिमित्ताने बागल यांनी उपस्थित केला आहे.

    आधीच कोरोनाचे संकट, तोंडावर आलेला पावसाळा,शेतीच्या मशागतीच्या काळात शेतकरी केवळ पैसे नसल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस लागवड खत पाणी करणे,शेतीची मशागत करणे शक्य होत नाही त्यामुळे सर्व साखर कारखानदारांनी त्वरित बिले द्यावीत अशी मागणी शेतकर्यांमधुन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: