जागतिक सायकल दिन आणि पंढरपूर सायकल क्लबचा वर्धापन दिन साजरा

जागतिक सायकल दिन आणि पंढरपूर सायकल क्लबचा वर्धापन दिन साजरा Celebrating World Cycle Day and Anniversary of Pandharpur Cycle Club
  पंढरपूर, 03/06/2021- जागतिक सायकल दिन आणि पंढरपूर सायकल क्लबचा ३ रा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी प्रांत अधिकारी पंढरपूर सचिन ढोले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रम करण्यात आला. 

यावेळी प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी आपल्या भाषणात, निरोगी आरोग्यासाठी कोणताही व्यायाम करणे, सकाळचे चालणे, फिरणे उत्तमच त्याचसोबत सायकलिंग करून पर्यावरणाचे व निसर्गाचे आणि आरोग्याचे रक्षण करा.आपले आरोग्य निरोगी ठेवा, असा संदेश दिला.याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सुनील उंबरे यांचा सत्कार करण्यात आला.

   या कार्यक्रमासाठी द.ह.कवठेकर प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री पाटील सर ,त्यांचे सहकारी विलास जोशी सर,श्री मोरे सर ,संतोष पाटोळे सर, त्याचबरोबर मंगेश परिचारक गुरुजी,विष्णूपंत गावडे गुरुजी,क्लब सदस्य सुरेश पाटील ,दिगंबर  भोसले सर,सतीश चंद्रराव सर ,सौ रेखा चंद्रराव मॅडम ,प्रकाश शेटे सर व महेश भोसले सर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: