सरकार दुकाने उघडणार की कायमची बंद करणार

सरकार दुकाने उघडणार की कायमची बंद करणार The government will open shops or close them permanently

कुर्डूवाडी / राहुल धोका- सोलापूर ग्रामीण भागात कोरोना संक्रमित संख्या बऱ्यापैकी कमी होत असतानाही लॉकडाऊन बाबत नियमावलीत आवश्यक सेवा वगळता अन्य व्यापार बंद ठेवण्यात आला असल्याने व्यापारी व नागरिकांत नाराजी पसरली आहे. सामान्य व्यापारी,हातगाडे, टपरीधारक यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे. मायबाप सरकार दुकाने उघडू देणार की कायमची बंद करावी लागणार असा आक्रोश दिसून आला. कोरोना रोगाचे शासकीय नियम पाळत सुरक्षित वातावरणात व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी अत्यावश्यक सेवा वगळून इतर व्यावसायिकांनी केली आहे. ती योग्य आहे मात्र नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी स्वतःची, कुटूंबातील सदस्यांची व ग्राहकांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. एकदा शिथिलता देण्यात आली की सर्व नियम पायदळी तुडवले जातात.कारण त्यावेळी कोणीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतो.

कुर्डुवाडीमधील काही व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया

कुर्डुवाडीतमध्ये सराफ दुकाने बंद आहेत. परंतु अन्यत्र काही प्रमाणात सराफी व्यवसाय चालू झाला आहे .बंदपेक्षा शासनाने लस व वैद्यकीय सेवा पुरवणे गरजेचे होते. सरकारी पगारी चालू आहेत. व्यापार बंद आहे तरी याचा विचार सामान्य व्यवसायिकावर कारवाई करताना करावा
प्रशांत पाठक,सराफ व्यापारी ,कुर्डूवाडी

सलुनची दुकाने सरकारने कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये सगळ्यात आधी बंद करावयास सांगितली. कोरोना पेशंट कमी झाले तरी अजूनही नाभिक समाजाची सलुनची दुकाने चालू झालेली नाहीत. काम करावे तेव्हा खावे अशी अवस्था असून दुकाने भाड्याची ,घरे भाड्याची, कुटुंबाचे पालन पोषण,कर्जाचे हप्ते,लाईट बिल हे सगळं सुरु आणि उत्पन्नच नाही.मायबाप सरकार दुकाने कधी उघडू देणार की कायमची बंद करावी लागणार
सुधीर गाडेकर,राष्ट्रीय नाभिक संघटना प्रदेश युवक अध्यक्ष

कापड दुकाने बंदच आहेत .दुकाने बंद असून ही कामगारांच्या पगारी चालू आहेत.त्यामुळे सशर्त व्यापार चालू करण्यास परवानगी मिळावी असे निवेदन न.पा कडे दिले होते मात्र त्यांना केवळ कारवाई करण्याशिवाय काहीच अधिकार नाहीत. सामन्य कापड दुकानदारांचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा. अर्थचक्र फिरले नाही तर देशाची अर्थव्यवस्था सुधारणार कशी?
विकास संचेती – अध्यक्ष कापड असोशीएशन, कुर्डूवाडी

व्यापाऱ्यांचे फार नुकसान झाले आहे. ५० ते ६० टक्के धंद्यात फरक पडला आहे. कामगारांना घरी बसून वेतन द्यावे लागत आहे.गेल्या वर्षी बँकेच्या कर्जाचे हप्ते बंद होते मात्र त्यावर व्याजावर व्याज आकारले आहे .सरकारने बंद काळातील कर्जाचे व्याज घेवू नये ,टँक्समध्ये सवलत द्यावी.सरकारी भाडेकरू आहेत त्यांचे तरी भाडे आकारू नये ही अपेक्षा
-प्रसाद साळुंके,सोमई फब्रिकेशन ,कुर्डूवाडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: