माता बालकांचा विकास हाच अंगणवाडीचा ध्यास

माता बालकांचा विकास हाच अंगणवाडीचा ध्यास The development of mother and child is the focus of Anganwadi
      पंढरपूर - आज दिनांक 4/6/2021 रोजी एकात्मीक बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) पंढरपूर, अंगणवाडी क्रमांक -  P-37 ,P-38,P- 39 यांच्या संयुक्त विद्यमाने C.B.E अंतर्गत विशेष C.B.E कार्यक्रम अं.क्रं P-39 विरंगुळा हॉटेल पाठीमागे साजरा करण्यात आला. 

या कार्यक्रमास 0.6 वयोगटातील माता पालक, गर्भवती माता,स्तंनदा माता तसेच कार्यक्रमाच्या  अध्यक्षा प्रकल्पाच्या मुख्य सेविका सौ.सविता जगताप मॅडम उपस्थित होत्या. 

 कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.जगताप मॅडम यांनी बालकांची वजन, उंची पालकांसमोर घेताना मोलाचे मार्गदर्शन दिले.कोरोनाच्या काळात बालकांची काळजी कशी घ्यावी तसेच आरोग्य व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी श्री.जाधव साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती गवळी यांनी केले.प्रस्तावना शर्मिष्ठा ओव्हाळ यांनी केले. या कार्यक्रमासाठी सौ.लक्ष्मी धोत्रे यांचे सहकार्य लाभले.आभार प्रदर्शन रंजना शिर्के यांनी केले.या  कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका ,मदतनीस उपस्थित होत्या. 

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: