व्यापारी व कामगारांचे लसीकरण करण्याची भारतीय राष्ट्रवादी पक्षाची मागणी

व्यापारी व कामगारांचे लसीकरण करण्याची भारतीय राष्ट्रवादी पक्षाची मागणी Bhartiya Rastravadi party demands vaccination of traders and workers
 पिंपरी चिंचवड,04/06/2021 - व्यापारी व त्यांच्या कामगारांचे लसीकरण व त्यांच्यासाठी प्रभाग वाईस नियोजन करण्याबाबत आयुक्त राजेश पाटील,पिंपरी चिंचवड महानगर पालिका, पिंपरी यांना भारतीय राष्ट्रवादी पक्षाचेवतीने अजित प्रकाश संचेती, जनसंपर्क प्रमुख महाराष्ट्र यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. 

  पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमधील सर्व प्रकारचे दुकाने उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे आणि आता सर्व दुकानात गर्दी होत आहे .त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यासाठी आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमधील सर्व छोटे व्यापारी,विविध प्रकारचे व्यावसाईक, भाजी विक्रेते,फिरता व्यवसाय करणारे ते बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे त्यांच्या कामगारांचे लसीकरण करून घेण्यात यावे व त्यांच्यासाठी प्रभाग वाईस हे लसीकरण करण्यात यावे,असे मागणी भारतीय राष्ट्रवादी पक्षाचेवतीने अजित प्रकाश संचेती यांनी एका निवेदनाद्वारे आयुक्त राजेश पाटील,पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडे केली आहे.                        

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: